वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले
चाटणाचा मुख्य उपयोग हा असतो, की ते व्याधींपर्यंत लवकर पोहोचतं. मधामध्ये एकजीव केल्यामुळे ते ताबडतोब फुप्फुसांमधला कफ काढणं, श्वास मोकळा करणं, श्वासाची घरघर थांबवणं ही कामं करतं. चाटण प्रवाही पद्धतीने तिथपर्यंत पोहोचून फुप्फुसांना मोकळं करतं. योगवाही चूर्ण त्वरित छोट्या छोट्या नसांपर्यंत पोहोचून कामाला लागतं.