डॉ. बाळ फोंडकेजीनोम सिक्वेन्सिंग या तंत्रात एखाद्या सजीवाच्या संपूर्ण जनुकसंचयाचं वाचन करून त्यातील जनुकांची क्रमवारी निर्धारित केली जाते. त्याच तंत्राचा वापर करून वैज्ञानिकांनी कॉफीच्या तब्बल ३९ जातींच्या जनुक क्रमवारीचा धांडोळा घेतला. .समजा तुम्ही उपहारगृहात कॉफीची मागणी केली, तर सहसा वेटरकडून त्यावर कोणताही प्रतिप्रश्न विचारला जाण्याची शक्यता नसते. उडपी उपहारगृह असेल, तर खास दाक्षिणात्य धाटणीची फिल्टर कॉफीच तुम्हाला मिळेल. इतर ठिकाणी फारतर फिल्टर की नेसकॅफे, असा सवाल केला जाईल. पण आता सर्वत्र स्थिरावलेल्या केवळ कॉफीच देणाऱ्या कॅफेमध्ये मोका, अमेरिकानो, कॅपॅचिनो, एस्प्रेसो, फ्रॅपे असे विविध प्रकार समोर येतात. त्यातही परत दुधाची लाते आणि बिनदुधाची ब्लॅक हे प्रकार आहेतच. साखरेची की बिनसाखरेची असे पर्याय ठेवले जात नाहीत. कारण साखर वेगळी दिली जाते. तुम्हाला हवी असल्यास आणि हवी तितकी वापरता येते.कॉफीमध्ये एवढे प्रकार असले तरी खास शौकिनांचं समाधान होत नाही. त्यांना कॉफीच्या जातकुळीचाही वेध घ्यायचा असतो. आपण तांदळाबाबत कसे चोखंदळ असतो; वाडा कोलम, सुरती कोलम, इंद्रायणी, आंबेमोहर, बासमती, यापैकी एका प्रकाराला पसंती देतो, तसं या कॉफीबाबतही होतं. अनेकविध जातींपैकी एकीला पसंती दिली जाते.कॉफीच्या अरेबिका, रोबस्टा, लायबेरिका आणि एक्सेल्सा या चार प्रमुख जाती. त्यात परत त्यांची लागवड कुठं झाली होती, ब्राझीलमध्ये, कोलंबियामध्ये, इथिओपियात की आणखी कुठं, यावरून उपजाती तयार होतात. कॉफीचे खरे शौकीन बाजारातून बिया आणून, त्या भाजून त्यांची पावडर करून त्याचंच पेय तयार करतात. .या निरनिराळ्या जातींमधला फरक त्यांच्या जनुकीय वारशात सापडतो. जनुकीय वारसा ही फक्त मानवजातीची किंवा प्राण्यांची मक्तेदारी नाही. सर्वच सजीवांच्या गुणधर्मांचं नियोजन त्यांच्या ठायी असलेल्या जनुकसंचयाकडूनच केलं जातं. पुनरुत्पादनासाठी प्राथमिक स्थितीतल्या सजीवांनी विभाजनाची वाट धरली होती. एका पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी, दोनाच्या चार अशारितीनं पुढच्या पिढ्यांची रुजवात केली जाई. त्यांची जनुकं प्रत काढल्यासारखी एकसारखी असत. त्यामुळं त्यांच्यात विविधता निर्माण होण्यात काही अडथळा येई. म्हणूनच निसर्गानं अधिक उत्क्रांत सजीवांमध्ये मीलनाचा महामार्ग चोखाळण्याला प्राधान्य दिलं. प्रत्येक प्रजातीत नर आणि मादी अशा दोन वर्गांची निर्मिती करून, त्यांच्या मीलनातून नव्या पिढीला जन्म देण्याची प्रथा सुरू झाली. त्यापायी जैववैविध्य प्रस्थापित होऊन एकाच सजीवाच्या विविध प्रजाती अस्तित्वात येऊ लागल्या. प्रत्येकाचा जनुकीय वारसा वेगवेगळा असल्यामुळं विविधतेला बळकटी येण्यास मदत झाली.त्याचाच मागोवा घेत आता वैज्ञानिकांनी अरेबिकाच्या जनुक क्रमवारीची संगती लावत, त्या जातीचा उदय केव्हा आणि कसा झाला, हे शोधून काढलं आहे. जिथं आता इथिओपिया आहे त्या प्रदेशात सहा लाख वर्षांपूर्वी अरेबिकाचा जन्म झाला. त्यापूर्वी तिथं कॉफिया कॅनेफोरा आणि कॉफिया युजेनॉइडस या दोन जाती फोफावल्या होत्या. त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या संकर होऊन त्यातून अरेबिकाचा उगम झाला, असा त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. याचाच अर्थ असा होतो, की आधुनिक मानवजातीच्या उदयापूर्वी कितीतरी आधी या कॉफीनं आपल्या आयुष्याला सुरुवात केली होती.जीनोम सिक्वेन्सिंग या तंत्रात एखाद्या सजीवाच्या संपूर्ण जनुकसंचयाचं वाचन करून त्यातील जनुकांची क्रमवारी निर्धारित केली जाते. त्याच तंत्राचा वापर करून वैज्ञानिकांनी कॉफीच्या तब्बल ३९ जातींच्या जनुक क्रमवारीचा धांडोळा घेतला. त्यात कॉफिया अरेबिका या जातीचाही समावेश होता. त्या क्रमवारींची एकमेकींशी तुलना केली गेली. त्यातूनच मग इथिओपियाच्या जंगलांमध्ये त्या दोन पुरातन जातींमध्ये नैसर्गिकरित्या घडून आलेल्या संकरातून अरेबिकाचा उदय झाल्याचं स्पष्ट झालं. त्या जातीच्या इतिहासाचीही माहिती मिळाली.त्यानंतरच्या सहस्रकामध्ये पृथ्वीच्या हवामानात झालेल्या आंदोलनांचा परिणाम तिच्या वाढीवरही झाला. चाळीस हजार ते सत्तर हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडात त्या प्रदेशाला अवर्षणानं ग्रासलं होतं. साहजिकच अरेबिकावर अनिष्ट परिणाम होऊन तिच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली. एक वेळ तर ती समूळ नष्ट होईल की काय असाही संभ्रम निर्माण झाला होता. पण त्यानंतरच्या सहा हजार ते पंधरा हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडात हवामानात अनुकूल बदल झाले. त्या कालखंडाला ‘आफ्रिकन दमट हवामान’ असं म्हटलं जातं. त्याला प्रतिसाद देत अरेबिका परत जोमानं वाढू लागली. .या जातीची उत्क्रांती जरी नैसर्गिकरित्या झाली असली तरी त्यानंतर मानवानं तिची लागवड करायला सुरुवात केली. रानावनात स्वयंभूरित्या वाढ होण्याचे दिवस संपले. साधारण पंधराव्या शतकामध्ये इथिओपिया आणि येमेन या प्रदेशात तिची मोठ्या प्रमाणावर लागवड होऊ लागली. एका आख्यायिकेनुसार, भारतीय साधू बाबा बुदान यांनी येमेनमधून अरेबिकाच्या सात बिया चोरून भारतात आणल्या आणि इथं अरेबिकाच्या देशी अवताराची स्थापना झाली. आता या प्रजातीचं उत्पादन देशातच होत आहे. तरीही ती अरेबिकाची एक उपजातच मानली जाते. अरबी प्रदेशातली जात अस्सल मानली जाऊन जगभर ज्या ज्या इतर ठिकाणी तिचं उत्पादन घेतलं जातं त्यांना उपजातीचाच दर्जा दिला गेला आहे. तसं असलं तरी कॉफीच्या जगभरात होणाऱ्या प्रसाराला त्यांनी मोलाचा हातभार लावला आहे यात शंका नाही.अरेबिकाच्या गुणधर्मांचं जतन करण्यासाठी तिचा संकर होऊ दिला जात नाही. जवळच्या नात्यातील प्रजोत्पत्तीच्या असंकरित प्रणालीला इनब्रीडिंग असं म्हटलं जातं. तसं झाल्यानं अरेबिकामध्ये विविधता निर्माण झालेली नाही. साहजिकच असे इनब्रेड सजीव रोगांचा आणि कीटकांचा मारा सहन करण्यात दुबळे असतात. कॉफी लीफ रस्ट या त्याच्या पानांवर गंज चढल्यासारखा परिणाम करणाऱ्या रोगजंतूंच्या उपसर्गामुळे दरवर्षी एक ते दोन अब्ज डॉलरचं नुकसान होत असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या रोगाला बळी पडण्याला कारक असलेल्या जनुकाचा शोध त्यासाठी घेतला गेला. त्याची जागा रोबस्टा या जातीतल्या रोगाला दाद न देणाऱ्या जनुकामध्ये असल्याचं ध्यानात आल्यावर जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं त्याचं रोपण अरेबिकामध्ये केलं गेलं आहे. त्याची परिणती अरेबिकाच्या रोगमुक्त वाढीत होऊ घातली आहे. इंडोनेशियाजवळ असलेल्या तिमोर या देशामध्ये तो जनुकरोपणाचा प्रयोग करण्यात आला आहे. जनुकाच्या नैसर्गिक वारशाला बगल देत त्यापायी उद्भवणाऱ्या दुबळेपणावर मात करता येते, हेच या संशोधनानं स्पष्ट केलं आहे.(डॉ. बाळ फोंडके नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक वविज्ञानकथा लेखक आहेत.)-------------------.अंदमान आणि निकोबार ५७१ बेटांचा द्वीपसमूह; पण लोकवस्ती मोजक्याच बेटांवर का? .ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.