निर्मला देशपांडेउसाच्या रसाचे पेय साहित्यआले घातलेला उसाचा रस, दूध, मिरपूड /जिरे पूड.कृती रसाच्या प्रमाणाइतकेच दूध रसामध्ये घालावे. चवीनुसार मिरपूड किंवा जिरे पूड घालावी. आवश्यकतेनुसार बर्फाचा चुरा घालून सर्व्ह करावे. हे पेय फारच मधुर, चवदार लागते. .पियुषसाहित्यगोड ताक, साखर, मीठ, जायफळ पूड, केशर.कृतीताक गाळून घ्यावे. त्यात चवीनुसार साखर, मीठ, चिमूटभर जायफळ पूड घालावी. केशर नसल्यास केशरी रंग घालावा. हे मिश्रण चांगले ढवळावे. सर्व्ह करताना त्यावर बर्फाचा चुरा घालावा. .लस्सीसाहित्यगोड मलईचे दही, साखर, मीठ, बर्फ.कृतीदह्यात पाणी, साखर व चवीप्रमाणे मीठ घालून खूप घुसळावे. त्यानंतर मिक्सरमध्ये घुसळावे. लस्सी सर्व्ह करताना ग्लासमध्ये थोडी साय आणि उपलब्ध असल्यास गुलाबपाणी व बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करावी. .आले-लिंबू सरबतसाहित्यलिंबाचा रस, मीठ, साखर, थोडा आल्याचा रस, बर्फ.कृतीलिंबाच्या रसात आवश्यकतेप्रमाणे मीठ व साखर घालावी. चमच्यात घेऊन चव बघावी. आवश्यक वाटल्यास आणखी घालावे. आल्याचा कीस व पाणी मिक्सरवर एकत्र करून घ्यावे. त्यात हा रस चवीनुसार घालावा. थंड पाणी घालावे. आवडत असल्यास थोडा बर्फ घालून सर्व्ह करावे. .आवळा-पुदिना-लिंबू सरबतसाहित्यपाव किलो आवळे, पाव किलो साखर, अर्धी वाटी आल्याचा कीस.कृतीआवळे किसून, थोडे पाणी घालून मिक्सरमधून काढून गाळून घ्यावे. आल्याच्या किसातही थोडे पाणी घालून रस गाळून घ्यावा. साखरेत पाणी घालून पाक करावा. त्यात आवळ्याचा व आल्याचा रस घालून दोन चांगल्या उकळ्या आणून सरबत करावे. थंड झाल्यावर हवाबंद बाटलीत भरून ठेवावे. फ्रिजमध्ये ठेवल्यास वर्षभर टिकते. सर्व्ह करताना लिंबू-पुदिना सरबतात आवश्यकतेनुसार घालून द्यावे. .कोल्ड कॉफी (प्रकार १)साहित्यकॉफी, दूध, आइस्क्रीम.कृतीकॉफी जास्त कडक करून घ्यावी. साखर कमी घालावी. फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करावी. गार कॉफीमध्ये आइस्क्रीम घालून भरपूर घुसळावे. फेस आल्यावर छानशा ग्लासमध्ये कॉफी सर्व्ह करावी. .कोल्ड कॉफी (प्रकार २)साहित्यकॉफी, दूध, क्रीम.कृतीनेहमीप्रमाणे कॉफी करावी. थोडी कडक करावी. फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करावी. वर क्रीम घालून आणखी थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवावी. आवडत असल्यास बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करावी. .पुदिन्याचे सरबतसाहित्यएक मोठा बाऊल पुदिन्याची ताजी पाने, साखर.कृतीपुदिन्याची पाने बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यात घालावी. त्यात थोडे पाणी घालून रस काढून गाळून घ्यावा. अर्धी वाटी साखरेत पाणी घालून पाक करावा. त्यात पुदिन्याचा गाळलेला रस घालून उकळी आणावी. सर्व्ह करताना आले-लिंबू सरबतात हे पुदिन्याचे सरबत आवश्यकतेनुसार एक-दोन चमचे घालावे. .फालूदासाहित्यचार चमचे सब्ज्याचे बी, ८ चमचे कॉर्नफ्लोअर, १ कप पाणी, ८ चमचे साखर, ६ कप दूध, दुधावरचे क्रीम किंवा आइस्क्रीम, दीड कप साखरेचा पाक.कृतीसब्ज्याचे बी दोन तास दुधात भिजत घालावे. कॉर्नफ्लोअर, साखर व पाणी एकत्र करून घट्टसर शिजवून घ्यावे. शेवपात्रातून या मिश्रणाची दुधात शेव पाडावी व त्यात आवश्यक त्या प्रमाणात साखरेचा पाक घालावा. तयार शेवेवर सब्ज्याचे बी व गुलाबपाणी किंवा इसेन्स घालून त्यावर क्रीम किंवा आइस्क्रीम घालून सर्व्ह करावे. .दूध कोल्ड्रिंकसाहित्यदूध, साखर, खाण्याचा गुलाबी रंग /गुलाब इसेन्स.कृतीदुधात आवश्यकतेनुसार साखर घालून ढवळावे. मग त्यात खाण्याचा गुलाबी रंग किंवा गुलाबाचा इसेन्स घालावा. (हल्ली बाजारात गुलाबाचा तयार इसेन्स मिळतो.) या मिश्रणात बर्फ घालून थंडगार दूध कोल्ड्रिंक सर्व्ह करावे. .मसाला ताकसाहित्यगोड ताक, जिरे पूड, पादेलोण, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग.कृतीताकात वरील सर्व साहित्य घालून व्यवस्थित ढवळावे आणि सर्व्हकरावे. आवडत असल्यास थोडा बर्फ, बारीक चिरलेला पुदिना घालून सर्व्ह करावे. .अमृत कोकम (प्रकार २)साहित्यसुकी आमसुले, मीठ, गूळ किंवा साखर, थंड पाणी, जिरे पूड.कृतीघरात असलेल्या सुक्या आमसुलांचेही छान अमृत कोकम होते. आमसुले स्वच्छ धुऊन थंड पाण्यात थोडावेळ भिजवून ठेवावीत. थोड्यावेळाने आवश्यक तेवढे पाणी ठेवून आमसुले हलक्या हाताने कुस्करून पाणी गाळून घ्यावे. कोकम भिजवलेले पाणीही त्यात गाळून घालावे. मग त्यात चवीप्रमाणे किसलेला गूळ किंवा साखर, मीठ व चिमूटभर जिरे पूड घालून सर्व्ह करावे. .अमृत कोकम (प्रकार १)साहित्यकोकमाचे आगळ, मीठ, साखर, थंड पाणी, जिरे पूड.कृतीकोकमाचे आगळ बाजारात तयार मिळते. जेवढे अमृत कोकम करायचे असेल तेवढे पाणी घेऊन त्यात चवीनुसार आगळ, मीठ, साखर व थोडी जिरे पूड घालून ढवळावे. साखर विरघळल्यावर ग्लासमध्ये घालून हे टेस्टी पाचक सर्व्ह करावे.-----------------------------.Gudi Padwa Recipe : गुढीपाडव्यासाठी करा पारंपरिक गोडाचे पदार्थ..! आम्रखंड, बासुंदी, खव्याच्या साटोऱ्या आणि बरंच काही..! .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.