टीको ब्राहेची निरीक्षणे

शिक्षण पूर्ण करून एप्रिल १५६७मध्ये टीको ब्राहे (Tycho Brahe १५४६-१६०१) डेन्मार्कमधील आपल्या घरी परत आला तेव्हा डेन्मार्क आणि स्विडन यांच्यात युद्ध सुरू होते.
Brahe, Tycho
Brahe, Tychosakal
Updated on

धूमकेतूसंबंधीचे टीकोचे निरीक्षण आणि त्याचे त्यापूर्वीचे नभपटलावरच्या नवीन ताऱ्याचे निरीक्षण; ही दोन्ही निरीक्षणे, आकाशगोल अपरिवर्तनीय आहे या अॅरिस्टॉटलच्या सिद्धांताला आणि ग्रहांच्या स्फटिकगोलांच्या संकल्पनेला फार मोठा फटका होता, कारण धूमकेतू दोन ग्रहांच्या गोलांमधून जात होता.

शिक्षण पूर्ण करून एप्रिल १५६७मध्ये टीको ब्राहे (Tycho Brahe १५४६-१६०१) डेन्मार्कमधील आपल्या घरी परत आला तेव्हा डेन्मार्क आणि स्विडन यांच्यात युद्ध सुरू होते. त्याने राजकारणात आणि कायद्याच्या व्यवसायात शिरावे, अशी टीकोच्या घरच्यांची इच्छा होती.

पण तो मात्र आपला संपूर्ण वेळ ज्योतिषशास्त्रासाठी देण्याचा निर्णय करून आला होता आणि त्याच्या या निर्णयाला नंतर त्याच्या घरच्यांनीही साथ दिली. टीकोचा जन्म डेन्मार्कमधील मोठ्या प्रभावशाली परिवारात झाला होता, हे आपण मागील लेखात पाहिले.

घरी पतल्यानंतर टीकोला पुढच्या वर्षीच रास्किल्ड कॅथेड्रलमध्ये कॅनन म्हणून नेमण्यात आले. हे एक मानद पद असते आणि अशा व्यक्तीकडे आपल्याला आवडेल ते काम करायला भरपूर वेळ असतो.

मे १५७१मध्ये टीकोच्या वडिलांचा, ऑट ब्राहेचा, मृत्यू झाला. डेन्मार्कचा राजा फ्रेड्रिक (द्वितीय) पाण्यात पडला असताना, ऑटने पाण्यात उडी मारून त्याला वाचवले होते. पण त्यानंतर ऑटला स्वतःलाच न्यूमोनिया झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच वर्षी टीको क्रीस्तीन नावाच्या सामान्य घरातल्या मुलीच्या प्रेमात पडला.

तत्कालीन डेन्मार्कमध्ये अशा लग्नांना मान्यता होती, पण त्या मुलीला आणि तिच्या मुलांना उच्चकुलीन लोकांना असणारे विशेषाधिकार मात्र मिळत नसत. तसेच तिला आपल्या नवऱ्याच्या किंवा तिच्या मुलांना आपल्या पित्याच्या संपत्तीवर अधिकारही सांगता येत नसे.

टीकोच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता, पण फ्रेड्रिक (द्वितीय) मात्र टीकोच्या बाजूने होता. सामाजिक बंधनांमुळे लग्न शक्य झाले नाही, पण टीको आणि क्रीस्तीन टीकोच्या मृत्यूपर्यंत एकत्र राहत होते.

Brahe, Tycho
Nashik News : जिल्ह्यातील 4 धरणांमधून पहिला विसर्ग
खगोलीय वेध घेण्यासाठी तयार केलेले पहिल्या उपकरणाचे चित्र. याचाच उपयोग टीकोने धूमकेतूची निरीक्षणे घेण्याकरता केला होता.
खगोलीय वेध घेण्यासाठी तयार केलेले पहिल्या उपकरणाचे चित्र. याचाच उपयोग टीकोने धूमकेतूची निरीक्षणे घेण्याकरता केला होता.

याच सगळ्या काळात टीको डेन्मार्क सोडून जाण्याच्या विचारात आहे हे फ्रेड्रिक (द्वितीय)ला कळल्यावर राजाने एक विशेष दूत पाठवून टीकोला भेटायला बोलावले आणि टीको डेन्मार्कमध्येच राहिला तर त्याच्या खगोलनिरीक्षणांसाठी आणि खगोलअभ्यासासाठी वेधशाळा बांधण्यासाठी मदत करण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला.

यावेळेपर्यंत डेन्मार्क आणि स्विडनमधील युद्धही थांबलेले होते. प्रस्ताव मान्य करून टीकोने डेन्मार्क आणि स्विडन यांच्यामध्ये असलेल्या वीन (Hven) या एका दूरच्या बेटावर आपली वेधशाळा उभारण्याचे ठरवले.

या वेधशाळेचे नाव ‘युरेनीबोर्ग’ (Uraniborg). ग्रीक पुरणकथांमध्ये साहित्य, विज्ञान आणि कलांच्या नऊ प्रेरणादायी देव्यांची कल्पना करण्यात आली आहे. युरेनी ही त्यातील खगोलशास्त्राची संरक्षक देवी आहे आणि बोर्ग म्हणजे किल्ला. टीकोने पुढे युरेनीबोर्गसाठी डेन्मार्क आणि स्विडन या दोन्ही देशांतील धनाढ्य लोकांकडून मदत तर मिळवलीच पण त्याचबरोबर त्याने चर्चचा पाठिंबाही मिळवला.

वीन बेटावर आता पूर्णपणे टीकोचेच राज्य होते. तिथे तो म्हणेल ती पूर्व दिशा असाच न्याय होता, त्याच्यावर कसलेच बंधन नव्हते. त्याला इतकी मोकळीक होती, की त्याचा पाळीव इल्क (युरोप आणि आशियाच्या उत्तर भागांत तसेच उत्तर अमेरिकेत आढळणारे एक मोठ्या आकाराचे हरिण) त्याला हवे तिकडे विहार करण्यास मोकळा असायचा, असे सांगतात.

वीन बेटावरची टीकोची वेधशाळा आणि रासायनिक प्रयोगशाळा त्या काळातील सर्वात अद्ययावत वेधशाळा आणि प्रयोगशाळा होती. या वेधशाळेची कोनशिला ८ ऑगस्ट १५७६ रोजी बसवण्यात आली आणि पुढच्या चार वर्षांत युरेनीबोर्ग वेधशाळा पूर्ण झाली.

Brahe, Tycho
Nashik News : खुशखबर! आता रेशनकार्डधारकांना मिळणार जिल्ह्यातील रुग्णालयात मोफत उपचार; जाणून घ्या सविस्तर...

या वेधशाळेसाठी लागणारी उपकरणे टीको स्वतः आपल्या देखरेखीखाली बनवून घेत असे. दुर्बिणीपूर्व काळातील ही सर्वात मोठी आणि अचूक निरीक्षणे मिळवून देणारी वेधशाळा होती. खगोलीय घड्याळापासून ते दोन ताऱ्यांमधील (कोनीय) अंतर अचूक मोजता येणारी अनेक उपकरणे या वेधशाळेत होती.

टीकोची रासायनिक प्रयोगशाळा ही युरेनीबोर्गच्या तळघरात होती. बेटावर एकाधिकार आणि वेळेच कसलेही बंधन नसल्याचा फायदा टीकोने अत्यंत उच्च श्रेणींची निरीक्षणे घेण्यासाठी केला. यात त्याची धाकटी बहीण सोफी त्याला एक सहायक म्हणून लाभली होती.

टीकोच्या पुस्तकातील या पानावर सूर्य इतर ग्रहांसमवेत पृथ्वीची परिक्रमा करत आहे हे दाखवले आहे.
टीकोच्या पुस्तकातील या पानावर सूर्य इतर ग्रहांसमवेत पृथ्वीची परिक्रमा करत आहे हे दाखवले आहे.

वातावरणांतील घटकांच्या प्रभावामुळे युरेनीबोर्गमधील उपकरणांच्या अचूक निरीक्षणे घेण्याच्या क्षमतेत कमतरता येते आहे, असे काही दिवसांच्या निरीक्षणांनंतर टीकोच्या लक्षात आले. तसेच बेटावरच्या लोकांच्या हालचालींमुळे वेधशाळेच्या भिंतीत होणाऱ्या कंपंनांचाही निरीक्षणांवर प्रभाव पडत होता.

मग टीकोने एक नवीन वेधशाळा बांधली. या नव्या वेधशाळेला त्याने नाव दिले ‘स्टर्नेबोर्ग’ किंवा ताऱ्याचा किल्ला. इथे त्याने सर्व उपकरणे जमिनीच्या खाली बसवली होती.टीकोच्या वेधशाळेची ख्याती त्याकाळी संपूर्ण युरोपमध्ये पसरली होती. अनेक शास्त्रज्ञ आणि विद्वान त्याच्या वेधशाळेमध्ये अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी येऊन राहत असत.

नोव्हेंबर १५७७मध्ये एक मोठा प्रखर धूमकेतू आकाशात दिसायला लागला. टीकोने या धूमकेतूची अत्यंत काटेकोर निरीक्षणे घेतली. हा धूमकेतू चंद्राच्याही पलीकडून प्रवास करत आहे, असा निष्कर्ष त्याने या निरीक्षणांच्या आधारे काढला.

धूमकेतूंची निर्मिती पृथ्वीच्या वातावरणात धुरांपासून किंवा ढगांपासून होते, असा त्याकाळी धूमकेतूंबद्दल समज होता. धूमकेतूसंबंधीचे टीकोचे हे निरीक्षण आणि त्याचे त्यापूर्वीचे नभपटलावरच्या नवीन ताऱ्याचे निरीक्षण; ही दोन्ही निरीक्षणे, आकाशगोल अपरिवर्तनीय आहे या अॅरिस्टॉटलच्या सिद्धांताला आणि ग्रहांच्या स्फटिकगोलांच्या संकल्पनेला फार मोठा फटका होता, कारण धूमकेतू दोन ग्रहांच्या गोलांमधून जात होता.

या काळापर्यंत टीकोने कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित सिद्धांताकडे लक्ष वळवले नव्हते. कदाचित ग्रह सूर्याची परिक्रमा करतात असे त्याला आता वाटू लागले होते.

पण पृथ्वीचे जडत्व टिकवून ठेवण्याकरिता त्याने अशी कल्पना मांडली, की पृथ्वी एका जागी स्थिर आहे, चंद्र पृथ्वीची परिक्रमा करतो; बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी सूर्याची परिक्रमा करतात आणि या सर्वांना घेऊन सूर्य पृथ्वीची परिक्रमा करतो.

Brahe, Tycho
Nashik News : ‘डिलिव्हरी बॉय’ झाले स्वयंघोषित मेकॅनिक; पैशांची मागणी करुन ग्राहकांची लूटमार

दुर्दैवाने युरेनीबोर्ग ही अप्रतीम वेधशाळा फक्त वीसेक वर्षेच अस्तित्वात होती. फ्रेड्रिक (द्वितीय)चे १५८८मध्ये निधन झाले. राजाच्या सल्लागाराचे, क्रिस्टोफर वॉल्किनड्रॉफचे, टीकोशी वाकडे होते; आणि राज्याचा वारस असणारा राजपुत्र त्यावेळी फक्त ११ वर्षांचा होता.

स्टर्नेबोर्ग वेधशाळा. उजव्या खालच्या बाजूचे उपकरण सोडले तर इतर सर्व उपकरणे जमिनीखाली होती.
स्टर्नेबोर्ग वेधशाळा. उजव्या खालच्या बाजूचे उपकरण सोडले तर इतर सर्व उपकरणे जमिनीखाली होती.

परिणामी टीकोला वीनमधून पळ काढावा लागला. सन १५९७मध्ये आपली काही उपकरणे आणि त्याने तयार केलेला एक हजार ताऱ्यांच्या आकाशातील जागा अचूक दाखविणाऱ्या कॅटलॉगसह टीको वीनमधून बाहेर पडला. पुढे दोन वर्षांनी त्याला रूडॉल्फ द्वितीय या रोमन सम्राटाने प्रागमध्ये आश्रय दिला.

रूडॉल्फच्या राज्यात मात्रा टीको आणि त्याच्या परिवाराला त्यांचे योग्य ते स्थान मिळले होते. टीको त्या काळात लोकांच्या पत्रिका तयार करणे, भविष्य सांगणे, हवामानाचा अंदाज सांगणे आणि खगोलीय घटनांचे अर्थ लावणे अशीही कामे करत असे.

इथेच टीकोने, एक वेगळ्या अर्थाने, आपला सर्वात मोठा शोध लावला आणि तो म्हणजे योहान्स केप्लर (Johannes Kepler १५७१-१६३०). टीको जे नव्हता ते सर्व केप्लर होता. वयाच्या ५४व्या वर्षी, २४ ऑक्टोबर १६०१ रोजी, टीकोचा अगदी विचित्र आणि क्षुल्लक कारणामुळे मृत्यू ओढवला.

एका शाही मेजवानीच्या वेळी टीकोने इतकी वाईन की प्यायली त्याचे मुत्राशय पूर्ण भरून गेले, टेबलावरून न उठण्याच्या शाही शिष्टाचारापायी पोट रिकामे करायला जाता येत नाही, म्हणून तो तसाच बसून राहिला आणि त्याचाच त्रास होऊन टीकोला जिवाला मुकावे लागले.

फक्त ५४ वर्षात आयुष्याच्या काळात इतक्या विविध घटनांतून प्रवास करणारा आणि सोळाव्या शतकाला माहीत असलेल्या जगाचे रूप बदलण्यास कारणीभूत असणारा हा एकमेव शास्त्रज्ञ आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.