सुधीर फाकटकरसंसर्गजन्य आजारांचा फैलाव आणि त्यातून निर्माण होत जाणाऱ्या महासाथी आपल्या देशाला चांगल्याच परिचित आहेत. ब्रिटिश कालखंडापासून काही संस्थांच्या उभारणीतून भारताने महामारीजन्य आजारांवर संशोधन करण्यासाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. .संत मीरा यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या संघर्षाला का सामोरे जावे लागले? संत मीराबाई पर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता? जाणून घ्या .याच अनुषंगाने वाढती लोकसंख्या तसेच बदलत जाणारा कालखंड आणि नवनवीन स्वरूपाच्या संसर्गजन्य किंवा असंसर्गजन्य आजारांमुळे निर्माण होणारी आव्हाने विचारात घेता, ‘रोगपरिस्थितीविज्ञान’ (एपिडेमिऑलॉजी) विषयावर शास्त्रीय संशोधन करण्यासाठी भारतीय आरोग्यविषयक संशोधन परिषदेने १९९९मध्ये चेन्नईमध्ये स्वतंत्र संस्था स्थापन केली.रोगपरिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात संशोधन आणि शिक्षण व प्रशिक्षण साध्य करत राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणे असा उद्देश समोर ठेवून राष्ट्रीय रोगपरिस्थितीविज्ञान संस्था (National Institute of Epidemiology -NIE) आकाराला आली आहे.या संस्थेत रोगपरिस्थितीविज्ञान आणि जैवसांख्यिकी, आरोग्य प्रणाली संशोधन, असंसर्गजन्य आजार, ग्रामीण आरोग्य संशोधन असे प्रमुख विभाग आहेत. या विभागांना विस्तृत अशा अद्ययावत प्रयोगशाळा तसेच अद्ययावत संगणकीय केंद्राची जोड असून येथे सार्वजनिक आरोग्यविषयक शिक्षण देणारा खास विभाग आहे. .भारतासह अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स येथील आरोग्यविषयक संस्थांशी साहचर्य प्रस्थापित केलेल्या या संस्थेने विविध प्रकारची कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार, एचआयव्ही, झिका, निपाह, रुबेला, चिकनगुनिया, कुष्ठरोग अशा अनेक संसर्गजन्य, असंसर्गजन्य आजारांसंदर्भात निदान आणि उपचार पद्धती विकसित केल्या आहेत.याशिवाय या संस्थेने अपघातादरम्यान निर्माण होणारे मेंदूशी संबंधित आजार, फुप्फुसांचा दाह तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे उदयास आलेले मधुमेह, रक्तदाब इत्यादी आजारांवरील संशोधन हाती घेतले आहे.मागील काही वर्षांमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या साथीत कोरोनाची लक्षणे ओळखणे, निदान आणि उपचार पद्धती तसेच लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी या संस्थेने केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे.संस्थेने संसर्गजन्य तसेच असंसर्गजन्य रुग्णांसाठी शहरात आणि खेडोपाडी राबविलेले तपासणी व शोध प्रकल्प विशेष उल्लेखनीय ठरले आहेत. येथे पूर्ण झालेल्या तसेच प्रगतिपथावर असलेल्या संशोधन प्रकल्पांची संख्या शेकड्यांच्या संख्येत आहे. .सोयाबीन खाल्ल्याने मिळतात एवढी पोषणमूल्ये? पण मुळात सोयाबीन कडधान्य की तेल बी?.संस्थेच्या संकेतस्थळावरील अहवाल वाचल्यास, संस्थेचे यूट्यूब चॅनेल पाहिल्यास अवघ्या दोन दशकात या संस्थेने दिलेले महत्त्वपूर्ण योगदान लक्षात येते.संस्थेने संकलित केलेला विविध आजार तसेच उपचारांचा डेटा रोगपरिस्थितीविज्ञान तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.शिक्षणासंदर्भात येथे रोगपरिस्थितीविज्ञान, सार्वजनिक आरोग्य आणि जैवसांख्यिकी या विषयांमध्ये एम.एस्सी. करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच चेन्नईतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने इथे पीएच.डी.चे शिक्षणही पूर्ण करता येते.वैद्यकीय पदवीधारकांसाठी एक आणि दोन वर्ष मुदतीचे विशेष अभ्यासक्रम राबवले जातात. या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. याशिवाय सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विषयांशी संबंधित विविध विषयांवरील अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने चालवले जातात.वैद्यकीय तसेच जैवविज्ञान शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी तसेच वैद्यकीय अधिकारी म्हणून कामाच्या संधीही संस्थेत उपलब्ध असतात.राष्ट्रीय रोगपरिस्थितीविज्ञान संस्थाआर-127, दुसरा प्रमुख मार्ग, अय्यपक्कम, चेन्नई -600077. तमिळनाडूसंकेतस्थळः https://nie.gov.in------------------------.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.