नव्या राज्यसेवेतील तिन्ही टप्प्यांचा सविस्तर व सखोल अभ्यास करण्यासाठी पूर्णवेळ तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास दररोज ८-१० तास अभ्यास करत किमान एक वर्ष तयारी करणे गरजेचे ठरणार आहे.
जे विद्यार्थी पदवीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या वर्षात आहेत, ज्यांच्याकडे २-३ वर्षांचा कालावधी उपलब्ध आहे, ते दीर्घकालीन नियोजनाद्वारे या परीक्षेची तयारी हाती घेऊ शकतात.
त्यासाठी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, विविध विषयांचे महत्त्व व स्थान, त्यासाठी वाचायचे संदर्भ साहित्य आणि या विषयांवरील जुने प्रश्न यांचा आधार घेऊन पेपर्स व विषयनिहाय सखोल नियोजन करावे.