बांधकामातील दुरुस्त्यांमुळे जुन्या इमारतींचे आयुष्य केवळ ४ ते ५ वर्षांनी वाढते. शिवाय, कमकुवत झालेल्या भिंती, पाणी झिरपणे, गळणारे पाण्याचे पाइप्स यांसारख्या अनेक समस्यांसाठी, डागडुजी करणे, आर्थिकदृष्ट्या किंवा बांधकामाच्या दृष्टीने फारसे व्यवहार्य नसते. यामुळेच पुनर्विकास हा आदर्श पर्याय ठरतो. यात जमिनीचे अधिक चांगल्या हेतूने पूर्ण उपयोजन होऊ शकते. अगदी मोक्याच्या ठिकाणांवरही प्रचंड मोठी गुंतवणूक न करता पुनर्विकास केला जाऊ शकतो.