टीम इंडियाचे आभार! पुरुषांचं रडणं तुम्ही Normalize केलं; पण पुरुष खरंच का रडत नाही?

खरंच पुरुषांना रडू न येण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? स्त्रिया आणि पुरुषांचे इमोशन वेगवेगळे असतात का?
Indian Cricket Player
Indian Cricket Player esakal
Updated on

मुंबई : तब्बल १७ वर्षानंतर भारताने 'टी २० विश्वचषक' जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्मासह, टीममधील खेळाडू हार्दिक पंड्या आणि विराट कोहली या तिघांनाही मैदानावरच अश्रू अनावर झाले. खरं तर पुरुषांनी रडणे आणि त्यातूनही जाहीरपणे रडणे ही घटनाच मुळी दुरापास्त.. त्यातून पुरुष रडला की तो कमकुवत मनाचा वैगेरे वैगेरे आणि अशातच अत्यंत धडधाकट क्रिकेटपटूच जेव्हा रडतात तेव्हा..? तेही कमकुवत मनाचे असतात का?

खेळाच्या मैदानात रडण्याच्या घटना नव्या नाहीत मागील वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या दरम्यान रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे जागतिक कीर्तीचे 'टेनिस प्लेअर' देखील ग्राऊंडवरच ढसाढसा रडलेले पाहायला मिळाले. तर युरो फुटबॉल मॅचदरम्यान शेवटचा 'पेनल्टी शॉट' हुकल्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो यालाही रडू फुटले...!

पुरुषांनी रडणे जे आधी अगदी त्यांच्या पौरुष्यत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरायचे ते आता काही प्रमाणात 'नॉर्मलईज' होऊ लागले आहे का? किमान या खेळाडूंच्या निमित्ताने तरी पुरुषांच्या डोक्यावर अनेक वर्ष असणारे न रडण्याचे ओझे उतरणार का? तसेच खरंच पुरुषांना रडू न येण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? स्त्रिया आणि पुरुषांचे इमोशन वेगवेगळे असतात का? पुरुषांना देखील रडल्यावर मोकळे झाल्यासारखे वाटते का? मानसोपचार तज्ज्ञांना काय वाटतं? जाणून घेऊया

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.