Dance Workout : नाचता नाचता व्यायाम!

घाम गाळण्यासाठी रोमांचक आणि प्रभावी मार्ग शोधत असाल, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमच्या रुटीनमध्ये झुम्बा, अॅनिमल फ्लो, डान्स वर्कआउट, जॅझरसाईझ, टबाटा आणि बूटी योगा यांचा समावेश नक्की करून पाहा!
dace workout
dace workoutesakal
Updated on

डॉ. तन्मयी पोरे

डान्स वर्कआउट मजेदार आणि प्रभावी असले, तरी आपण ते योग्य प्रकारे करतो आहोत का ह्याची खात्री करणे आणि फिटनेस तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तुम्ही ह्या प्रकारचा व्यायाम पहिल्यांदाच करत असल्यास तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन अत्यावश्यकच आहे.

अलीकडच्या काळात कोणत्याही गोष्टीमध्ये वैविध्य आणणे अतिशय गरजेचे बनले आहे, म्हणजे कंटाळा येत नाही. हीच बाब व्यायामालाही लागू होते.

सतत एकसारखेच वर्कआउट रुटीन करत राहिल्याने कंटाळा येणे स्वाभाविक आहे. घाम गाळण्यासाठी रोमांचक आणि प्रभावी मार्ग शोधत असाल, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमच्या रुटीनमध्ये झुम्बा, अॅनिमल फ्लो, डान्स वर्कआउट, जॅझरसाईझ, टबाटा आणि बूटी योगा यांचा समावेश नक्की करून पाहा!

झुम्बा : डान्स युअर वे टू फिटनेस!

हा एक हाय एनर्जी डान्सचा प्रकार आहे. हा डान्स लॅटिन आणि इतर आंतरराष्ट्रीय संगीतावर केला जातो. ज्यांना नाचायला आवडते आणि ज्या व्यक्ती हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फिटनेस सुधारू इच्छितात, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

उत्तेजक संगीत आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण व्यायाम करत आहोत असे वाटतच नाही. झुम्बामुळे कॅलरी बर्निंग चांगले होते. त्याचबरोबर स्नायू टोन होतात आणि सांध्यांचे समन्वय सुधारते. त्याशिवाय डान्समुळे मिळणारा आनंद वेगळाच.

dace workout
Workout for Women: उन्हाळ्यात जिमला जावंसं वाटत नाही? महिलांनी घरीच करावा हा व्यायाम

ॲॅनिमल फ्लो : अनलिश युवर इनर बीस्ट!

ॲॅनिमल फ्लो हा शरीराचे वजन वापरून करायचा व्यायाम आहे. हा प्रकार प्राण्यांच्या हालचालींपासून प्रेरणा घेऊन डिझाईन करण्यात आला आहे.

या प्रकारात शरीराची एकूण कार्यक्षमता, स्नायूंची ताकद व लवचिकता आणि गतिशीलता सुधारते. ॲॅनिमल फ्लो सेशनमध्ये बेअर क्रॉल, क्रॅब वॉक आणि स्कॉर्पियन रीच यांसारखे व्यायामप्रकार शिकवले जातात. फिट होण्याचा हा एक मजेदार आणि डायनामिक मार्ग आहे.

डान्स वर्कआउट : ग्रूव्ह युअर वे टू बेटर हेल्थ!

डान्स वर्कआउटमध्ये हिप-हॉप आणि बॅलेपासून समकालीन आणि अगदी पोल डान्सिंगपर्यंत विविध प्रकारच्या नृत्य शैलींचा समावेश आहे. हा प्रकार तंदुरुस्ती आणि नृत्य यांना जोडणारा धागा आहे. यामुळे शरीराची लवचिकता, संतुलन राखण्यास मदत होते.

तसेच सहनशक्तीही तपासली जाते. नृत्य एक उत्कृष्ट तणाव निवारक आहे आणि नृत्यामुळे आपल्या मेंदूमध्ये एंडॉर्फिन नावाचे हार्मोन स्रवते, त्यामुळे मन आनंदी आणि उत्साही राहते. तुम्ही अनुभवी नर्तक असाल किंवा नसाल; तरीही प्रत्येकाला करता येईल असे हे वर्कआउट आहे.

टबाटा : शॉर्ट, स्वीट ॲण्ड इन्टेन्स!

टबाटा हा एक हाय इन्टेन्सिटी इन्टरव्हल ट्रेनिंगचा प्रकार आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम करायचा असेल तर टबाटाचा पर्याय स्वीकारला जातो. टबाटा सेशनमध्ये वीस सेकंद जास्तीत जास्त प्रयत्न करून व्यायाम केला जातो त्यानंतर दहा सेकंद विश्रांती घेतली जाते.

या पद्धतीने चार मिनिटे व्यायाम केला जातो, म्हणजे वर्कआउटच्या एकूण आठ फेऱ्या होतात. हे ऐकताना जरी सोपे वाटत असले, तरी हे एवढे सोपे नाही.

टबाटा वर्कआउट कॅलरी बर्न करण्यासाठी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी आणि चयापचय वाढविण्यासाठी खूपच प्रभावी आहेत. व्यग्र जीवनशैली असलेल्या लोकांसाठी हा एक नावीन्यपूर्ण मार्ग आहे.

dace workout
Sonalee Kulkarni Garva Dance: गारवाला २५ वर्ष! सोनाली कुलकर्णी - फुलवाचा भर पावसातला गारवा डान्स बघाच

जॅझरसाईझ : स्विंग, स्वेट ॲण्ड स्माईल!

जॅझरसाईझ हा १९६०च्या दशकात जुडी शेपर्ड मिसेट यांनी आणलेला डान्स फिटनेस प्रोग्राम आहे. यात जॅझ डान्स, रेझिस्टन्स ट्रेनिंग आणि संगीतावर सेट केलेल्या व्यायामाचा समावेश असतो.

ह्यात प्रशिक्षित प्रशिक्षकांसह करण्यात येणारा नृत्यकेंद्रित वर्कआउटही असतो किंवा सामर्थ्य वाढवणाऱ्या प्रशिक्षणापर्यंत विविध प्रकारचे वर्ग असतात.

हा प्रकार सामाजिक मनोरंजनावर भर देण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे तो सर्व वयोगटातील फिटनेससाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना आकर्षक वाटतो. सध्या वैयक्तिक आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारात जॅझरसाईझचा आनंद घेता येणे शक्य आहे.

बूटी योगा : बिकम ट्रायबल!

हा एक प्रकारचा ट्रायबल डान्सचा प्रकार आहे.  वजन कमी करण्यासोबतच तुमच्या शरीराला सुडौल करण्याचे काम हा व्यायामप्रकार करतो.  बूटी योगामध्ये एकाचवेळी अनेक व्यायामप्रकार करायचे असतात.  हे व्यायाम करताना चांगलीच दमछाक होते.  सांधेदुखी किंवा तत्सम आजारांसाठी हा प्रकार सुचवला जातो.

वर दिलेल्या सर्व व्यायाम प्रकारांची तीव्रता जास्त असल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे डान्स प्रकार सुरू करू नयेत. ज्या लोकांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे विशेषतः त्यांनी आणि व्यायाम करू इच्छिणाऱ्या इतरांनीही आपल्या शरीरासाठी कोणता प्रकार योग्य आहे हे तज्ज्ञांना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे व्यायाम सुरू करावेत.

dace workout
Benefits Of Zumba For Kids : लहान मुलांसाठी झुम्बाचे आहेत 'हे' फायदे

हे व्यायाम करण्याआधी दहा-पंधरा मिनिटे वॉर्मअप करावा, म्हणजेच काही सोपे व्यायाम प्रकार करावेत, उदाहरणार्थ सूर्यनमस्कार घालावेत.

ह्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह हळूहळू वाढतो आणि शरीराला व्यायाम केल्यानंतर त्रास होत नाही. डान्स करताना सैल आणि सुटसुटीत कपडे घालावेत जेणेकरून शरीराची हालचाल सोपी होईल. सुरुवातीला पंधरा मिनिटे करून पाहावे, त्यानंतर हळूहळू वेळ वाढवावा.

साधारण तासभर अशा पद्धतीचा डान्स वर्कआऊट करून २५० ते ६०० कॅलरी बर्न होऊ शकतात.  डान्स सुरू करण्याआधी जसा वॉर्मअप गरजेचा आहे, तसेच डान्स झाल्यावरसुद्धा शरीर हळूहळू पूर्ववत होणे गरजेचे आहे. त्यासाठी एकदम डान्स न थांबवता, हळूहळू वेग कमी करावा. थांबून थोडा वेळ स्ट्रेचिंग करावे.

लक्षात ठेवा, हे वर्कआउट मजेदार आणि प्रभावी असले, तरी आपण ते योग्य प्रकारे करतो आहोत का ह्याची खात्री करणे आणि फिटनेस तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुम्ही ह्या प्रकारचा व्यायाम पहिल्यांदाच करत असल्यास तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन अत्यावश्यकच आहे.

त्याशिवाय तुमच्या शरीराचे नेहमी ऐका आणि तुमच्या फिटनेस पातळीनुसार तीव्रता निश्चित करा. नाचत राहा, स्वस्थ राहा!

---------------

dace workout
Benefits of Zumba : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे झुम्बा, जाणून घ्या ‘हे’ फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()