नाद करा पण 'रील्स' चा कुठं? रील्सपायी जीव धोक्यात घालणाऱ्यांना या गोष्टी का कळत नाहीत?
आज महाराष्ट्रात ३०हून अधिक स्थानिक रेस्क्यू टीम्स.. कोणताही मोबदला, कोणत्याही अपेक्षेशिवाय पदरचा वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च करून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम्स उन्हापावसात, थंडी-वाऱ्यात आणि वेळेच्या कोणत्याही प्रहरी धावून जातात
‘सेन्सिबल कन्टेन्ट क्रिएशन’ हा आज जितका कळीचा मुद्दा आहे, तितकाच रिल्समध्ये कितीही काहीही दाखवलं, तरी आपण रिस्क घ्यावीच कशासाठी? हा प्रश्न स्वतःला विचारणं ही स्वयंशिस्तीची आणि अपघात रोखण्याची पहिली पायरी आहे.