निकिता कातकाडेआर्टिफिशियल फुले, रंगीबेरंगी पडदे, मल्टीकलर एलईडी दिवे, झिरमिळ्या, कलरफुल वॉल हँगिंग, टेक्स्चर्ड कागद, फुलांचे-मोत्यांचे तोरण, मुकुट आणि गणपतीच्या देखण्या मूर्तींनी पुण्यातील तुळशीबाग आणि रविवार पेठ सजली आहे. .पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे सगळ्यांसाठी आकर्षणाचा विषय. राज्यभरातून गणेशोत्सव पाहण्यासाठी गणेशभक्त पुण्यात गर्दी करीत असतात. पुण्यातला गणेशोत्सव जसा सगळीकडे प्रसिद्ध, तसेच गणेशोत्सवाच्या काळात सजावटीच्या साहित्याने गजबजलेली तुळशीबागदेखील प्रसिद्ध आहे.गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने वैविध्यपूर्ण सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली असून, नानाविध प्रकारचे सजावटीचे साहित्य दिसू लागले आहे.गणेशोत्सवाचा चाहूल लागताच तुळशीबागेतील विक्रेत्यांमध्ये धावपळ सुरू झालेली दिसतेय. विक्रेत्यांनी असंख्य प्रकारच्या साहित्याची आकर्षक मांडणी करून दुकाने सजवली आहेत. यंदा बहुतांशी लोक थीमनुसार सजावटीचे साहित्य खरेदी करीत आहेत.त्यात वेगवेगळ्या रंगांनुसार थीम, काल्पनिक मंदिरे किंवा प्रख्यात मंदिरांच्या प्रतिकृती, पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांवर आधारित थीम, फुलांची सजावट आणि वेगवेगळ्या वास्तूंची प्रतिकृती अशांचा समावेश आहे. गणपतीसाठी आसने, पडदे, झिरमिळ्या, फुले, दिवे, आर्टिफिशियल रांगोळी असे साहित्य खरेदी केले जात आहे.हे साहित्य प्रामुख्याने पर्यावरणपूरक आहे. पारंपरिक सजावटीपासून ते आधुनिक कलाकृतींपर्यंत सर्व काही बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या वस्तूंसोबतच दरवर्षी सजावटीच्या साहित्यामध्ये अनेक नवनवीन प्रकारच्या साहित्याची भर पडते. त्यामध्ये प्रिंट व जाळीचे पडदे, विविध रंगांचे दिवे, चमकदार कागद, झुंबरे, आसने, मखरे असे साहित्य आढळते.प्लॅस्टिक, लाकूड आणि एमडीएफपासून तयार केलेली मखरे लक्ष वेधतात. मखरांमध्ये यावर्षी नवीन डिझाईन बघायला मिळत आहेत. पांडुरंग, स्वामी समर्थ, महादेव यांची मखरे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. या मखरांची किंमत २०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत आहे..सजावटीचे विविध प्रकारपारंपरिक सजावट : या प्रकारात रंगीबेरंगी फुलांच्या माळांपासून निसर्गचित्रे आणि पारंपरिक पद्धतीच्या गणपती मंदिरांपर्यंत बरीच व्हरायटी उपलब्ध आहे. यामध्ये रांगोळ्या, फुलांचे हार आणि विविध प्रकारच्या हस्तकला वस्तूंचा समावेश दिसतो. गणपतीचा शेला, पणत्या, मल्टीकलर शेडसह फुलांचे विविध प्रकारही आहेत. तोरणांचेही अनेक प्रकार बघायला मिळतात. या सर्वांची किंमत ७० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहे. आधुनिक थीम्स : आधुनिक सजावटीत विविध थीम्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, शाही महाल, बॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटांमधील दृश्ये अशी विविधता दिसते. सांस्कृतिक दृश्ये : तुळशीबागेत अनेक ठिकाणी सांस्कृतिक थीम्सवर आधारित सजावटीचे साहित्य आहे. इतिहासातील प्रसिद्ध घटनांची किंवा किल्ल्यांची मांडणी करून आकर्षक मखरे तयार केली आहेत. या मखरांची किंमत ३०० रुपयांपासून ३ हजारांपर्यंत आहे.सजावटीचे साहित्यलाईट्स : सजावटीसाठी वेगवेगळ्या रंगांचे लाईट्स उपलब्ध आहेत. झगमगाट करणारे, रंगीबेरंगी आणि इतरही अनेक प्रकारचे लाईट्स बघायला मिळतात. सजावट अधिक आकर्षक करणारे एलईडी लाईट्स विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत. फेअरी लाईट्सलाही भरपूर मागणी आहे. यावर्षी सजावटीसाठी प्रोजेक्टर आणि स्पेशल इफेक्ट्स असणारे लाईट्सदेखील आहेत. त्यामध्ये लेझर लाईट्स, स्पॉटलाईट्स बघायला मिळतात. रंगीत कागद व कापड : सजावटीसाठी रंगीबेरंगी कागदांचा वापर करून तयार केलेल्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. रंगीत कागदांपासून बाप्पासाठी विविध प्रकारची आकर्षक आभूषणेही तयार केली आहेत. पेपर फ्लॉवरचे विविध प्रकार आहेत. तसेच सॅटिन आणि सिल्क कापडांचे रंगीबेरंगी पॅटर्नदेखील उपलब्ध आहेत. सत्तर रुपये मीटरपासून ३०० रुपये मीटरपर्यंत आकर्षक कापड मिळू शकते. कस्टम बॅकड्रॉप्स : यावर्षी सजावटीसाठी कस्टम बॅकड्रॉप्स तयार करून देणारीही अनेक दुकाने आहेत. तुम्हाला हव्या त्या रंगांचे आणि नक्षीचे कापड डिझाईन केले जाते. ."गणपती सजावटीसाठी लागणारे सर्व प्रकारचे पडदे आमच्याकडे आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या थीमनुसार सजावट केली जाते. चंद्रयान, विश्वकरंडक, रामायण यांसारख्या संकल्पना घेऊन ग्राहक आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांच्या संकल्पनेनुसार कापड उपलब्ध करून देतो. आमच्याकडे होलसेल भावात पडद्यांची विक्री केली जाते."- आशुतोष जाधव, विक्रेते, तुळशीबाग"दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची मखरे तयार करतो. थीमनुसार मखरे मोठ्या प्रमाणावर केली जातात. ग्राहकांच्या मागणीनुसारदेखील आम्ही मखरे करून देतो. आमच्याकडे ग्राहकांना आकर्षित करतील अशी मखरे तयार केली जातात, त्यामुळे ग्राहक मोठ्या संख्येने मखर घेऊन जातात. "- भारत सावंत, विक्रेते, मंडई----------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.