(Marathi article about Delhi air pollution and its Effect)
सुनील चावके
दिल्लीच्या आसमंतात दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आबालवृद्धांचा श्वास कोंडणारे वायू प्रदूषण मुक्कामाला येते. ते शिगेला कसे पोहोचते हा काही गूढ आणि अनाकलनीय विषय राहिलेला नाही. सर्व माहिती सरकारकडे आहे, पण प्रश्न आहे तो सरकार आणि नोकरशाहीच्या इच्छाशक्तीचा.