राकेश कुल्चावाला
पाऊस पडून गेल्यावर...
पाऊस पडला, की गारवाची गाणी ऐकणं आपल्याकडे एक आन्हिक मानलं जातं. पण दिल्लीत तशी परिस्थिती नाही. दिल्लीत क्वचितकाळी पाऊस पडतो. जेव्हा पडतो, तेव्हा तो कोसळतो. आधीच दिल्लीकरांना पावसाची सवय नाही. त्यामुळे पाऊस आला, की सगळं वातावरण भांबावल्यासारखं होतं. दुचाकीस्वार फ्लायओव्हरखाली आसरा घेतात.