पनिराचे विणतो शेले
दिल्लीचं नाव घेतलं आणि पनीरचा उल्लेख झाला नाही, तर काहीतरी राहिलंच म्हणून समजा. पनीर हा दिल्लीकरांचा श्वास आहे. एकवेळ पाणी नाही मिळालं तर चालेल, पण पनीर हवंच. पंजाबी संस्कृतीत पनीर विपुल प्रमाणात खाल्लं जातं. त्यामुळेच की काय, दिल्लीत पनीर कुठेही आणि कधीही मिळू शकतं. कुठल्याही डेअरीमध्ये गेलात, तर पनीरची एक मोठी वीट असतेच.