दिल्लीचा पाऊस आणि चहादिल्लीत पाऊस दुर्मीळ आहे, पण आला तर बदाबदा येतो. असं असलं, तरी पावसाचा आनंद घेतला नाही तर कसं? पाऊसप्रेमींची पहिली पावलं वळतात ती चहाकडे. पण दिल्लीच्या पावसासारखाच दिल्लीचा चहासुद्धा फारसा आनंददायी नसतो. .इथल्या चहाच्या टपऱ्यांची कथाच वेगळी आहे. इथे चहा किटलीत करून ठेवलाय असा प्रकार नसतो. तुम्ही आलात, तर तुम्हाला चहा करून देण्यात येईल. मग कधी आधीच्या चहाचा चोथा, थोडीशी फ्रेश चहा पावडर आणि धबाधबा आलं कुटून प्लॅस्टिकच्या कपात चहा देतात.कुल्लड इथे जास्त मिळतात. पण त्या कुल्लडला मातीचा वास हमखास येतोच. चहाची चव पण ठीकठाकच असते. चहाची वेळ नसली तर वेळेवर चहा लागतोच म्हणा. त्यामुळे दर्दी लोकांच्या चहावर उड्या पडतातच. पण अगदी ‘अमृततुल्य’ म्हणावा असा चहा दिल्लीत मला अजूनतरी मिळालेला नाही. काही टपऱ्यांवर चहाबरोबर काळ्या झालेल्या तेलात ब्रेड पकोडे, कचोडी तळतात आणि बटाट्याच्या भाजीबरोबर देतात.मोबाईलमध्ये पाहण्याचा भोचकपणालोकल ट्रेन जशी मुंबईकरांची लाइफलाइन आहे, तशीच मेट्रो दिल्लीकरांची लाइफलाइन आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. दिल्लीच्या असह्य उकाड्यात मेट्रोनं प्रवास करणं हे स्वर्गसुखापेक्षाही कमी नाही. मेट्रोमध्ये शिरताच अनेकविध लोकांच्या स्वभावाचं दर्शन होतं. सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते आठ-नऊ या वेळात मेट्रोत पाय ठेवायला जागा नसते. साहजिकच एकमेकांना खेटून उभं राहावं लागतं. इंटरनेट वाऱ्यासारखं उपलब्ध असताना मोबाईल पाहिला नाही तर कसं व्हायचं? त्यामुळे लोक आपापले मोबाईल पाहतातच. पण खरी मजा येते ती म्हणजे एकमेकांच्या मोबाईलमध्ये वाकून पाहण्यात. दिल्लीच्या मेट्रोनं प्रवास करणाऱ्या अनेकांना ही खोड आहे. सतत डोळ्याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये पाहत राहतात. ज्याच्या फोनमध्ये पाहतात त्याच्या लक्षात आलं, तर तो एक सणसणीत कटाक्ष टाकतो आणि पाहणाऱ्याची नजर वळते. तरी ही खोड जात नाही. अपवाद फक्त क्रिकेट मॅचचा. एखादी महत्त्वाची मॅच असेल तर फोनमध्ये दुसऱ्याने मान घुसडून मॅच पाहिली तरी लोकांची हरकत नसते. तेव्हा मेट्रोतही चिडीचूप शांतता असते. कुठेही गेलं तरी मोबाईल पाहण्यात दंग राहणं हा इथल्या जीवनशैलीचाच एक भाग आहे..खारी बावलीआमच्या कामासाठी मसाले अतिशय महत्त्वाचे. त्या मसाल्यांमुळेच आमची ओळख. हे मसाले स्वस्त आणि मस्त मिळण्याचं दिल्लीतलं एकमेव ठिकाण म्हणजे खारी बावली. चांदनी चौकातून पुढे गेलं, की मसाल्यांचा सुवास नाकात शिरतो. तो शिरला, की खारी बावली आलंच म्हणून समजा. अतिशय गजबजलेल्या या परिसरात मसाल्यांचा महापूर येतो. इथे विविध प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. त्याबरोबर ड्रायफ्रूट्सही विपुल प्रमाणात मिळतात. त्यामुळे प्रत्येक दुसऱ्या दुकानात काजू, बदाम, मनुका, अंजिराच्या माळा, अक्रोडांची चळत लागलेली तुम्हाला पाहायला मिळेल. एखाद्या लाल मिरचीच्या दुकानासमोरून गेलात तर ठसका ठरलेलाच. तिथे विकायला बसलेल्या लोकांना ठसका लागत नाही कारण त्यांचं नाक सरावलेलं असतं. इथं मखाणे, विविध प्रकारची लोणची, मुरांबे, चटण्या यांचीही दुकानं आहेत.लोणच्याच्या दुकानात ‘पहिल्या क्रमांकाचे बक्षीस विजेते’वगैरे जाहिरात केली जाते. आता लोणच्यांची कसली आलीये स्पर्धा, असा विचार साहजिकच मनात येतो. याबरोबर विविध प्रकारच्या चहा पावडरींचं एक वेगळं दुकान इथं सापडतं. अगदी साध्या बटाट्याच्या भाजीसाठीसुद्धा इथं मसाला मिळतो. मोठमोठाली पोती, खोके घेऊन जाणारे माथाडी कामगारही मोठ्या संख्येनं दिसतात. इथे आल्यावर हरखून गेलात तर हेच कामगार ‘बाजू हटो, सरको’ असा जोरजोरात गलका करून तुम्हाला भानावर आणतात. एकूणच हे एक ‘मसालेदार’ प्रकरण आहे.------------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.