डॉ. अविनाश भोंडवे
आजमितीला भारतात डेंग्यूविरोधी कोणतेही अँटिव्हायरल औषध किंवा परवानाकृत लस नाही. चारही सेरोटाइप्सवर चांगला परिणाम होणे आवश्यक असल्यामुळे प्रभावी लस विकसित करणे कठीण आहे.
डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा आजार जगातील उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातल्या भागांत मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सर्वसामान्यपणे डेंग्यू झाल्यावर थंडी वाजून ताप येतो, नडग्या, गुडघे, घोटे खूप दुखतात, अंगावर पुरळ येते आणि काही रुग्णांमध्ये यकृताला सूज येऊन कावीळही होते. डेंग्यू हेमोरेजिक फीवर आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम या गंभीर प्रकारांत शरीरांतर्गत गंभीर रक्तस्राव होऊन किंवा रक्तदाब अचानक खूप कमी होऊन रुग्ण दगावू शकतो.