कथा । अल्टा विरूद्ध कासव

Marathi Story : धामापूर प्रकल्पामुळे या कासवांच्या विणीच्या हंगामावर, त्यांच्या प्रजननाच्या प्रक्रियेवर किंवा एकूणच त्यांच्या या भागातल्या वास्तव्यावर काय काय परिणाम होऊ शकतात याचा अभ्यास प्रकल्पापूर्वीच केला जाणं गरजेचं होतं. पण धामापूर प्रोजेक्ट कंपनीनं असा अभ्यास केलेलाच नाहीये
Marathi court case story
Marathi court case storyEsakal
Updated on

डाॅ. मिलिंद जोशी, मुंबई

रात्रीचे साडे नऊ-पावणे दहा झाले असतील. नोव्हेंबर महिना. थंडीची चाहूल लागायला लागली होती. दिल्लीच्या तुघलक क्रिसेंट नावाच्या अतिउच्चभ्रू वस्तीत शांतता पसरली होती. दगडी कौलारू बंगले पेंगुळले होते. आवारातल्या उंच झाडांच्या पानांची सळसळ आणि रस्त्यावरून भर्रकन वेगात जाणारी एखादी श्रीमंती गाडी इतकाच काय तो आवाज त्या शांत वातावरणावर तरंग उठवत होता.

जेवण उरकून, नॅपकिनला हात पुसत ते बाहेर दिवाणखान्यात आले. समोर सोफ्यावर त्यांची दहा-बारा वर्षांची नात पालथी झोपून लॅपटॉपवर अल्टा विरुद्ध कासव हा इंटरनेट गेम खेळण्यात दंग झाली होती. पट पट पट पट करत एकेक पिवळा बिंदू गिळत गिळत पुढे जाणारं कासव आणि त्याच्या अंगावर धावून जाणारं पिट्टा भूत, आणि त्याच्याच बरोबर लक्ष वेधून घेणारा वरच्या उजव्या कोपऱ्यातला चकाकत्या गोल रिंगेतल्या ‘A’चा लोगो.

दोन मिनिटं त्यांनी लॅपटॉपच्या पटलाकडे बघितलं, उजव्या कोपऱ्यातला चकाकत्या गोल रिंगेतल्या Aचा लोगो काहीतरी खुणावत असल्यासारखं वाटलं. जाणीवपूर्वक त्यांनी नजर दुसरीकडे वळवली. टीपॉयवर आजचं वर्तमानपत्र पडलं होतं.

पहिल्याच पानावर बातमी होती ‘अल्टा स्टीलचा ग्रीनग्रोथ इंटरनॅशनल विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल’. लांब पाय पसरून त्यांनी स्वत:ला शेजारच्या सोफ्यात झोकून दिलं आणि टीपॉयवरचं वर्तमानपत्र उचलून, नाकावर घसरलेला चष्मा वर करत त्यांनी बातम्या चाळायला सुरुवात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.