डॉ. सुधीर कुलकर्णी, पुणे
डायल्कस हे डायबेटिक फूट अल्सरवरच्या (Diabetic Foot Ulcer-डीएफयू) उपचाराचे औषध नुकतेच बाजारात आले आहे. डीएफयू म्हणजे मधुमेहामुळे होणाऱ्या पायांवरच्या तसेच पावलांवरच्या किचकट, बऱ्या न होणाऱ्या जखमा. डीएफयूच्या जखमा भरून येण्यासाठी डायल्कस उपयोगी आहे.
हे औषध पुण्यातील नोव्हालीड फार्मा या कंपनीच्या संशोधनावर आधारित आहे. त्यात आणखी विशेष म्हणजे, एका भारतीय कंपनीने संपूर्णपणे देशात संशोधन करून जगात सर्वप्रथम भारतात विकसित केलेले हे पेटंट मिळविलेले औषध आहे. त्यानिमित्ताने या संशोधनाचा तसेच डायल्कसच्या (ज्याचे मूळ नाव गॅलनोबॅक्स होते) निर्मितीचा जवळजवळ १२ ते १४ वर्षांचा हा प्रवास...