आहारशास्त्र आणि पोषणशास्त्र यांचं भान जपणं हे आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. उत्तम आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि सुयोग्य आहार हा आरोग्याचा गुरुमंत्र आहे! ‘नियमितता’ हा कळीचा शब्द आहे. नियमित वेळी खावे प्यावे. रोज ठरावीक वेळी आहार घ्यावा. घरातील सगळ्यांनीच नियमित वेळी जेवण्याचा प्रयत्न करावा.