वसंतपंचमीलाच व्रजभूमीला होळीचे वेध लागतात. मथुरा, वृंदावन, गोकूळ, बरसाणा, नंदगाव, गोवर्धन, बलदेव आदी गावे मिळून ओळखली जाणारी व्रजभूमी मुख्य होलिकोत्सव एकदोनच नाही, तर सलग आठदहा दिवस वेगवेगळ्या प्रकारांनी साजरी करते. म्हणूनच फाल्गुन शुद्ध अष्टमीला सुरू होणाऱ्या या महोत्सवाला होलाष्टक असे म्हटले जाते!