डॉ. अविनाश भोंडवे
दिवाळी साधारण हिवाळ्यातील हेमंत ऋतूदरम्यान येते. या दिवसांत भूक चांगली लागते. तेला-तुपाचे आणि गोडाचे पदार्थ खावेत असे सांगितले जाते. दिवाळी साजरी करताना होणाऱ्या आनंदाची आणि परस्परांच्या प्रेमाची वाट पोटातून जाते. मात्र या फराळाचे नियोजन योग्यरितीने केले, तर आरोग्यात बाधा येणार नाही.