Diwali Festival :यंदाच्या दिवाळीला तुम्ही कोणत्या लुकमध्ये दिसणार?

Actress
Actress esakl
Updated on

दसऱ्यापाठोपाठ दिवाळीची चाहूल लागते. दसरा आणि दिवाळी यांच्यामध्ये येणारा अजून एक सण असतो, आश्विन पौर्णिमेला साजरी होणारी कोजागिरी.

नवरात्रीपासून ते चातुर्मासाची समाप्ती होईपर्यंत तुळशीच्या लग्नापर्यंत ओळीने सर्व सण असतात. घरात पाहुण्यांचा ये-जा असते, फॅमिली फंक्शन असते. थोडक्यात, उत्सवाचा हा माहोल बराच काळ चालतो.

सोनिया उपासनी

साडेतीन मुहूर्तांपैकी एक गणला जाणारा मुहूर्त म्हणजे विजयादशमी, ज्याला आपण दसरा असेही म्हणतो. चातुर्मासातील हा एक महत्त्वाचा सण. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दशमीला म्हणजेच दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो.

धन, शक्ती आणि ज्ञान यांचे रूप असलेल्या महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन देवतांचे स्मरण व पूजन दसऱ्याच्या दिवशी केले जाते. नवरात्रात स्थापन केलेल्या देवीच्या मूर्तींचे विसर्जनही दसऱ्याला केले जाते. दसऱ्याला आपट्यांच्या पानांचे ‘सोने’ सर्व वडीलधाऱ्या मंडळींना देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.

Actress
Diwali Recipes 2023 : गोड लाडू, करंजीसोबत ताटाची शोभा वाढवेल मठरी, रेसिपी आहे एकदम सोप्पी

दसऱ्यापाठोपाठ दिवाळीची चाहूल लागते. दसरा आणि दिवाळी यांच्यामध्ये येणारा अजून एक सण असतो, आश्विन पौर्णिमेला साजरी होणारी कोजागिरी. नवरात्रीपासून ते चातुर्मासाची समाप्ती होईपर्यंत तुळशीच्या लग्नापर्यंत ओळीने सर्व सण असतात. घरात पाहुण्यांचा ये-जा असते, फॅमिली फंक्शन असते. थोडक्यात, उत्सवाचा हा माहोल बराच काळ चालतो.

कुठलाही सण म्हटला, की त्याबरोबर येते ती वॉर्डरोब मॅनेजमेंट. प्रत्येक सणाला घालायचे काय? लेटेस्ट ट्रेंड काय आहे? असे एक ना अनेक विचार डोक्यात गर्दी करतात. नेमके कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे यावर सण आले की विचार सुरू होतो.

एरवी तर वर्षभरात केल्या जाणाऱ्या कपड्यांच्या खरेदीमध्ये सामान्यतः रोज लागणाऱ्या कपड्यांची खरेदी केली जाते. सणासुदीसाठी, समारंभासाठी आणि विशेषतः दसरा- दिवाळीसाठी तर आपला कल भरजरी, ट्रॅडिशनल कपडे घेण्याकडे असतो.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या फॅशनमध्ये खूप विविधता बघायला मिळते. सर्व सणासुदीसाठी पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा मेळ ज्या ड्रेसमध्ये आहे, असेच ड्रेस आजकालची युवा पिढी निवडते. म्हणजे थोडक्यात नवीन ट्रेंड आंगिकारायचे, पण पारंपरिकता जपून. पारंपरिक साड्या, लेहंगा, घागरा, शरारा, हे सर्व पोशाख सण अथवा समारंभाच्या दृष्टिकोनातून घेतले जातात.

या सर्वांबरोबर रेशमी एम्ब्रॉयडरी, बिड्स वर्क यांना सर्वांत जास्त पसंती असते. वनपीस एथनिक गाऊनला तर या काळात फार मागणी असते. पंजाबी पटियाला सूट, फ्लेअर्ड ड्रेस, मॅक्सी ड्रेस, भरजरी कुर्ते हे सर्व तरुणींच्या विशेष पसंतीचे. धोती ड्रेस, सिगारेट पँट व कुर्ते, स्टोन वर्क केलेले घागरे अथवा कुर्ते यामध्ये बरेच वैविध्य सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. स्कर्टवर लाँग कुर्ता परिधान करण्याचा ट्रेंडही हल्ली जोरात आहे.

रेशमी कापडावर कुंदन वर्क केलेले स्कर्ट आणि त्यावर क्रॉप टॉप हेसुद्धा हल्ली ट्रेंडमध्ये आहे. स्कर्टवर क्रॉप टॉप व त्याला लाँग कोटी स्टाइल कुर्ता घालून वेगळाच एथनिक लुक देता येतो. वापरायलाही हे कम्फर्टेबल आहे.

Actress
Sakal Shopping Festival 2023 : सणासुदीच्या खरेदीचे महासेलिब्रेशन... सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलमध्येच!

साड्यांमध्येही पारंपरिक बनारसी, कांजीवरम, ब्रोकेड, पैठणी व इतर सर्व सिल्क हे सणासुदीसाठी खास खरेदी केले जातात. दर खेपेप्रमाणे लिनन ऑर्गन्झा, खण, इरकल व पार्टीवेअर साड्यांची जादूही कायम आहेच. ह्या प्रकारच्या साड्यांवर विशेषतः सिक्विनचे ब्लाऊज, कॉन्ट्रास्ट कलर ब्लाऊज हे जास्त करून वापरले जातात.

डिझायनर शरारे व लेहंगे यांचाही ट्रेंड सर्व वयोगटातील स्त्रियांमध्ये हल्ली दिसून येतो. पुरुषांनाही सण-समारंभाला एथेनिक वेअर शोभून दिसतात, आणि सध्या ते ट्रेंडमध्येही आहेत. सध्या एथनिक वेअरवर जॅकेट घालण्याचाही ट्रेंड आहे, त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या पारंपरिक कपड्यांवर जॅकेट शोभून दिसते. कुर्ता प्रिंटेड असेल तर त्यावर प्लेन जॅकेट व जॅकेट प्रिंटेड असेल तर प्लेन कुर्ता असे कॉम्बिनेशन घालता येते.

जॅकेटमध्येही प्रकार आहेत. शॉर्ट किंवा लाँग जॅकेटबरोबर कुर्ता आणि स्ट्रेट पँट घालण्याचा हल्ली तरुणांमध्ये ट्रेंड आहे. जीन्स, कॉड्राय पँट, लिनन ट्राउझर तर सगळ्या वयोगटातल्या पुरुषांमध्ये ऑल टाइम फेवरेट आहे.

यांच्याबरोबर शॉर्ट प्रिंटेड कुर्तेदेखील खूप छान दिसतात. हल्ली सर्वच वयोगटांमधील पुरुष कलमकारी, चिकनकारी, फ्लोरल प्रिंट आवडीने घालतात. घेरदार सलवारीवर शॉर्ट कुर्ता व जॅकेट हेसुद्धा ट्रेंडी आहे.

Actress
Diwali Decoration : आली माझ्या बाल्कनीत ही दिवाळी; ‘या’ टिप्सने सजवा तुमची बाल्कनी

घरातील लहान मुलांना नटलेले व सजलेले पाहण्याची हौस सर्व आई-वडिलांना व आजी-आजोबांना असतेच. म्हणूनच सणासुदीला या चिमुकल्यांसाठीही विविध फॅशन येतात. लहान मुलांसाठी पारंपरिक पोशाख, फ्युजन ड्रेस, इंडो वेस्टर्न स्टाइल ड्रेस विविध रंगांमध्ये उपलब्ध असतात.

कपड्यांबरोबर ॲक्सेसरीही हव्यातच. रिअल, इमिटेशन, पर्ल, क्रिस्टल, स्टोन अशा अनेक प्रकारच्या पर्यायांमधील ज्वेलरी बाजारपेठेत उपलब्ध आहे. तुमच्या पोशाखावर साजेल अशी ज्वेलरी तुम्ही खरेदी करू शकता.

एथेनिक वेअरवर मोठमोठ्या पर्स अथवा लेदर पर्सपेक्षा पारंपरिक कापडी बटवे, चंची, स्लिंग बॅग जास्त उठून दिसतात. रेशीम वर्क, स्टोन वर्क, जरदोजी वर्क केलेले बटवेही सर्वत्र उपलब्ध आहेत. स्त्री व पुरुषांसाठी वेगवेगळे कापडी हँडमेड फुटवेअरही मुबलक प्रमाणात सर्व बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत.

तुमच्या पोशाखावर साजेल असा रंगाचे, तसेच हिल अथवा फ्लॅट फुटवेअर खरेदी करावे. आणि अर्थातच पायात घातल्यानंतर कम्फर्टेबल असेच फुटवेअर घ्यावे. आणखी एक महत्त्वाचे, ह्या सर्व गोष्टींचे पूर्वनियोजन केले, तर आयत्यावेळी गडबड होत नाही व समारंभही सुरळीतरित्या पार पडतात.

Actress
Diwali Holidays : विद्यार्थ्यांना दिवाळीत मिळणार २० दिवस सुटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()