ज्ञानदेव गणपत जाधव
पाऊस पडून गेल्यावर रानोमाळ हिरवाईने भुई नटलेली असते. आकाश स्वच्छ, निरभ्र असते.रात्रीच्यावेळी शरदातील चांदणे लखलखत असते. अशा वातावरणात वसुबारसेचा दिवस उजाडतो. गोठ्यातील पशुधनाबद्दल आदरभाव ठेवून आपल्याकडील गाई, वासरे, म्हशी यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांना भाकरी, गवारीची भाजी, गोड पदार्थ खाऊ घालून त्यांची मनोभावे पूजा केली जाते.