स्वाती सुधीर दामले
दुधवा अभयारण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे राहणारी ‘थारू’ ही आदिवासी जमात. नेपाळच्या सीमाभागाजवळील बिहार, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशनजीकच्या प्रदेशांतील जंगलात वास्तव्यास असणाऱ्या या जमातीतील लोकांना जंगलाची खडानखडा माहिती असते. वन्यप्राण्यांचा माग काढणं ही त्यांची खासियत.