Editorial : ...चन्दनादपि चन्द्रमाः!

Air Pollution and global warming : लॉकडाऊनच्या काळात चंद्राच्या दृश्य पृष्ठभागावरील तापमानात घट झाली होती; शास्त्रज्ञांकडून संशोधन
moon and earth
moon and earthesakal
Updated on

संपादकीय

चार वर्षांपूर्वीची गोष्ट. दिवसातल्या आठही प्रहरांवर आक्रमण करणारे गाड्यांचे, हॉर्नचे, आगगाड्यांचे, विमानांचे, यंत्रांचे सगळे आवाज, सगळा कोलाहल, सगळी गजबज थांबून गेली होती. अस्वस्थ करणाऱ्या बदलांची नांदी घेऊन आलेल्या एका अशांत शांततेने जगाला लपेटले होते.

कोरोनाने मानवजातीच्या ललाटावर लिहिलेल्या लॉकडाउनच्या सुरुवातीचा हा काळ. सर्व काही ठप्प झाले असताना जगभरातल्या अनेकांना त्यांच्या अंगणा-परसात नांदणाऱ्या निसर्गाच्या ‘असण्याचा’ नव्यानेच परिचय होत असल्याच्या बातम्याही येत होत्या.

आपल्या आजूबाजूलाच असूनही एरवी न दिसणारे प्राणीपक्षी दिसू लागले होते, ऐकू येऊ लागले होते, हवेची गुणवत्ता सुधारली होती, प्रदूषणाचे प्रमाण घटले होते; जवळपास नऊ दशकांनंतर जालंदरवासीयांनी दूर क्षितिजावर असणारी हिमालयाची शिखरे पाहिली होती. हवेतले प्रदूषण कमी झाल्याचा तो एक दृश्य परिणाम होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.