अनुराधा दाते, व्हिज्युअल आर्टिस्ट आणि डिझायनर
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यासाठी सामान्यतः शाडूची माती वापरली जाते. शाडूची माती अतिशय कमी कार्बन फूटप्रिंट मागे ठेवते. शाडू मातीमध्ये सहजतेने शिल्पकाम करता येत असल्याने लहान मुलेही यातून विविध कलाकृती करू शकतात.
शाडू मातीमध्ये उष्णता सहन करण्याची ताकद असते. मऊ आणि लवचीक असल्याने आकार देण्यास ती सोपी असते.
शाडू मातीत केवळ पाणी मिसळून गोळा करता येतो. त्यामुळेही दीर्घकाळ टिकणाऱ्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शाडू माती योग्य आहे. कारागिरांना मूर्तींमध्ये अनेक बारकावे तपशीलांसह कोरता येतात.
हलका पिवळा ते गडद तपकिरीपर्यंतच्या रंगछटांमुळे काहीवेळा न रंगवताही शाडू मातीची मूर्ती अतिशय सुंदर आणि डौलदार दिसते.
1) कोरडी शाडू माती आणि पाणी मिसळून कणकेसारखा गोळा करून घ्यावा. शाडू माती मळत मळत लागेल तसे पाणी घालत जावे.
2) मळलेली माती शक्यतो ओल्या फडक्यामध्ये झाकून ठेवावी.
3) मातीचा गोळा जास्तीत जास्त मळून घ्यावा, म्हणजे भेगा पडणे टाळता येईल.