डॉ. सतीश प्रताप डुंबरे
कोविड महासाथीनंतरच्या काळात व त्यानंतर संपूर्ण जगाने व्याधीक्षमत्व व स्वास्थ्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचे महत्त्व चांगलेच ओळखले आहे. तसेच कर्करोग, मधुमेह, संधिवात, जुनाट त्वचारोग, पचनाचे विकार, वंध्यत्व, व्यसनाधीनता अशांसारख्या अनेक आजारांत आयुर्वेदिक उपचारांनी मिळणारा लाभ आता मोठ्या प्रमाणात समाजापुढे येऊ लागला आहे. पंचकर्म उपचार पद्धतीचे वलय तर वेगाने फोफावत आहे. आयुर्वेदिक प्रॅक्टिसच्या बलस्थानांविषयी आता विद्यार्थी आवर्जून माहिती करून घेऊ लागले आहेत.