केदार देशमुख
केंद्रशासनाने मॅन्युअल फॉर ड्रॉट मॅनेजमेंटमध्ये धोरणात्मकवजा काही उपाययोजनांचा उल्लेख केला आहे. यात प्रामुख्याने शेतीला साहाय्यक ठरणाऱ्या योजना आहेत. सिंचन योजना, रोजगार हमी योजना, पीक विमा, पाण्याची बचत करणारे विविध उपक्रम, पावसाळी पाण्याचा संचय, लोकसहभागातून करण्यात येणारी कामे, हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल असे काही उपाय सुचविले आहेत.