अनिकेत केळकर
एकदा इजिप्तमध्ये आलात, की तुम्ही तिथल्या सौंदर्याच्या प्रेमात पडता; इथले लोक अतिशय मनमिळाऊ, सभ्य आणि प्रामाणिक आहेत. इथली संस्कृती, इतिहास, खाद्यपदार्थ, नाईल नदीच्या आसपासचे जीवन अनुभवायचे असेल तर तुम्हाला इजिप्तला भेट द्यावीच लागेल. आणि सगळ्या इजिप्तची भ्रमंती करायची, तर येथे परत परत यावे लागेल.
इजिप्तची संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणता येईल. या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येकाला इजिप्तचा इतिहास, संस्कृती, खाद्यसंस्कृती एक वेगळाच अनुभव देऊन जाते. इजिप्त म्हटले, की डोळ्यासमोर भव्य पिरॅमिड येतात; पण पिरॅमिड आणि स्मारकांपलीकडेही तिथे बरेच काही आहे.