प्रदीप सावंत
वर्क फ्रॉम होम संपून हायब्रीड वर्क कल्चर सुरू झालं आणि वाहनांची गरज वाढली. दुचाकी वाहन, त्यातही स्कूटर, रोजच्या प्रवासासाठी सोयीची जात असल्यानं टू व्हीलर घेण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे ही इंडस्ट्री सातत्यानं वाढत राहिली. त्यातच ईव्ही गाड्यांची भर पडून इंडस्ट्री आणखी ताकदवान झाली.