यंदाच्या दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी होणार दणक्यात

electronics appliances
electronics appliances esakal
Updated on

हल्ली मोठमोठ्या दुकानांमध्ये अनेक प्रकारच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू एकाच छताखाली मिळतात. त्यामुळे ग्राहकांची सोय होते. लॅपटॉप, स्मार्ट वॉच, मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह ओव्हन, इयरफोन या वस्तूंना यंदा विशेष मागणी असल्याचे दिसते.

प्रियांका राऊत

सण-उत्सव म्हणजे नवीन वस्तूंच्या खरेदीचा मुहूर्त! सणासुदीला केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व नवीन वस्तू खरेदी करण्याला दिले जाते, विशेषतः दिवाळीला. कारण दिवाळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.

या नवीन खरेदीत कितीतरी गोष्टी येतात. घर, गाडी, घरात लागणाऱ्या वस्तू, शोभेच्या वस्तू आणि महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू.

दिवसेंदिवस आपण सगळेच सुखसोयींना जास्त महत्त्व देऊ लागलो आहोत. त्यामुळे लोक अगदी दहा हजारांपासून ते दोन-अडीच लाखांपर्यंत किमती असणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत.

ईएमआय सिस्टीममुळे महागड्या किमतीचे फोन, लॅपटॉप तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेणे सहज शक्य झाले आहे. याबरोबरच ई-कॉमर्स संकेतस्थळांवर खूप मोठ्या प्रमाणात ऑफर किंवा सणांच्या मुहूर्तावर अक्षरशः मोहात पाडणाऱ्या फेस्टिवल ऑफरसह विविध प्रकारचे सेल सुरू असतात. बाय वन गेट वन यांसारख्या ऑफरमुळे ऑनलाइन शॉपिंगलादेखील प्रतिसाद मिळतो आहे.

असे असले तरीही दुकानात प्रत्यक्ष जाऊन, स्वतः पाहून, निरखून गॅजेट निवडणे; त्याच्या फीचर, वॉरंटीविषयी सेल्समनला खोदून खोदून विचारून खात्री करून घेणे... यासारखी मजा ऑनलाइन शॉपिंगमध्ये नाही. म्हणूनच दुकानांमध्येही गर्दी आहेच.

electronics appliances
Mobile Cancer Threat : 'या' कंपन्यांचे फोन वापरल्याने वाढू शकतो कॅन्सरचा धोका; रिसर्चमध्ये समोर आली धक्कादायक माहिती!

हल्ली मोठमोठ्या दुकानांमध्ये अनेक प्रकारच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू एकाच छताखाली मिळतात. त्यामुळे ग्राहकांची सोय होते. दसरा-दिवाळीनिमित्त घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये प्रामुख्याने आढळतात स्मार्ट टीव्ही. सध्या दुकानांमधून स्मार्ट टीव्हींचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

सध्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे अगदी ३२ इंचांपासून ते ८५ इंचांपर्यंत एलईडी टीव्ही खरेदीसाठी ग्राहक उत्सुक आहेत. त्यांच्या किमती दहा हजार रुपयांपासून ते एक अगदी लाख रुपयांपर्यंत आहेत.

लॅपटॉप, स्मार्ट वॉच, मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह ओव्हन, इअरफोन यांसह विविध होम अप्लायन्सना यावर्षी मागणी आहे, अशी माहिती पुण्यातल्या महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनचे स्टोअर मॅनेजर रफिक मुजावर यांनी दिली.

या वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल जास्त आहे कारण यांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील अशा आहेत. विशेष म्हणजे, लाऊड स्पीकर व मोठमोठ्या साऊंड सिस्टीमला नवरात्रीमुळे भरपूर प्रमाणात मागणी असल्याचे आढळून आले.

त्यांची किंमत दहा हजार रुपयांपासून पुढे अगदी लाखापर्यंत आहे. विविध प्रकारचे होम थिएटरसुद्धा उपलब्ध आहेत. किचन अप्लायन्समध्ये सिंगल डोअर, डबल डोअर फ्रिजची व्हरायटी पाहायला मिळते.

त्यामध्ये १८० लिटरपासून ते ५०० लिटरपर्यंतचे फ्रिज उपलब्ध आहेत. यांच्या किमती वीस हजार रुपयांपासून ते अडीच लाख रुपयांपर्यंत आहेत. ओव्हन साधारण दहा हजार रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.

electronics appliances
Diwali Shopping In Mumbai : दिवाळीची खरेदी तर मुंबईतच करायची: दिवे,लाईट्स,सजावटीच्या वस्तूंची असंख्य व्हरायटी

काही वेळा काही ठरावीक कंपन्यांच्या गॅजेटना मागणी असते. बोट कंपनीच्या इयरफोन्सना सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. तसेच टीव्हींमध्ये सोनी, एलजी या कंपन्यांच्या एलईडी टीव्हींना सर्वाधिक मागणी आहे.

प्रत्येकाची आवड आणि गरज पूर्ण करणारे विविध प्रकारचे लॅपटॉप उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती दीड लाख रुपयांपर्यंत आहेत. खास विद्यार्थ्यांसाठी कमी किमतीतले, म्हणजेच पंधरा हजार रुपयांपासून लॅपटॉप उपलब्ध आहेत.

स्मार्ट फोनमध्ये आयफोन आणि गुगल पिक्सल हे फोन ट्रेंडमध्ये आहेत. हे फोन घेताना ईएमआयची सेवा उपलब्ध असल्याने हे फोन घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. अगदी साडेसहा हजार रुपयांपासूनही स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

थोडक्यात काय, तर या सणासुदीला तुम्हांलाही कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची असेल तर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. तुमची आवड आणि गरज यांचा एकदा का मेळ बसला की खरेदी दणक्यात होणारच!

यंदा दिवाळीचा शुभमुहूर्त तसेच क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा असा दुग्धशर्करा योग जुळून आल्यामुळे स्मार्ट एलईडी टीव्हीसाठी सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. तसेच स्मार्ट टीव्हीमध्ये दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने अद्ययावत एलईडी स्मार्ट टीव्हीला ग्राहक पसंती देतात.

त्याबरोबरच फ्रिज, वॉशिंग मशिन यांसह विविध गृहोपयोगी वस्तूंनाही चांगली मागणी आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही ईएमआयसह कॅशबॅक आणि विविध प्रकारच्या ऑफर ठेवल्या आहेत, जेणेकरून सगळ्यांनाच त्यांच्या आवडीच्या वस्तू या सणानिमित्त खरेदी करता येतील. - गुरप्रीत सिंग,पार्टनर, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन.

--------

electronics appliances
Xiaomi Smart TV: चक्क निम्म्या किंमतीत मिळतोय मोठ्या स्क्रीनसह येणारा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या ऑफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.