डॉ. आशुतोष जावडेकर
शब्दकोश घेऊन किंवा संदर्भ लावत वाचणं यापलीकडेदेखील वाचनाचे प्रकार आहेत. वाचायचं म्हणजे मनातच अशी काहीशी आपली समजूत असते. पण त्यात काही अर्थ नाही. काही पुस्तकं, पुस्तकातले प्रसंग आवर्जून मोठ्यानं अभिवाचन करत वाचले, की ते वाचन अगदी समृद्ध करणारा अनुभव देतं. त्याचबरोबर मनातल्या मनात शांत होत वाचण्याचं तंत्रही मोलाचं आहेच.