नेहा कुलकर्णी
आपल्याकडे महिलांमध्ये जगातली सर्व फॅशन एका बाजूला आणि साडी एका बाजूला ठेवता येईल, इतकी साडी जवळची आहे. ‘साडी म्हणजे प्रेम’ म्हणणाऱ्या कितीतरीजणी आपल्याला आजूबाजूला दिसतील. साडीची लोकप्रियता त्या त्या काळातल्या चित्रपटांमधूनही झळकते; आणि काही चित्रपटांतील नायिकांनी लोकप्रिय केलेल्या साड्या रसिकांच्या मनात कायमचं घर करून जातात...
‘एक लडकी भिगी भागी सी’मधल्या मधुबालापासून ते ‘धकधक करने लगा’च्या माधुरीपर्यंत हिंदी चित्रपटातल्या अनेक नायिकांनी साड्यांची फॅशन नुसतीच जपली नाही, तर हिंदी चित्रपटाला साडीतले अजरामर लुक बहाल केले. आजही एखाद्या नायिकेचं नाव घेतलं, की तिच्या नावावर नोंद असणारी साडी आठवते. सणावारांचे दिवस म्हणजे स्त्रीवर्गाचा साडी खरेदीचा काळ. साडी खरेदीला गेल्यावर सध्याचे लेटेस्ट ट्रेंड कळतीलच. पण त्या खरेदीच्या आधी हिंदी चित्रपटातल्या काही लक्षात राहिलेल्या साड्यांविषयी बोलू, कदाचित तुमची यंदाच्या दिवाळीची साडी हटके असेल.