संजीव साबडे, मुंबई
प्रत्येक शहरांची वा गावाची स्वतःची खाद्यसंस्कृती असते. हवामानामुळे वा तिथं काय उगवतं यामुळे. यवतमाळला वा वर्ध्यात जाऊन कोणी आवर्जून मिसळ वा साबुदाणा खिचडी खात नाही, शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलेली व्यक्ती कचोरी खाल्ल्याशिवाय परत येत नाही.