भाग्यश्री भुवड
श्रावण महिन्यापासून सणासुदीच्या मोसमाला सुरुवात होते. सणांची ही रेलचेल दिवाळीपर्यंत नटण्याची संधी देत असते. श्रावणातले अनेक छोटे-मोठे सण, गौरी-गणपतीचं आगमन, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि या सगळ्याला जोडून येणारी लग्नसराई नटण्याथटण्याची हौस पुरी करण्याची संधी देत असतात.
साहजिकच याचं प्रतिबिंब बाजारपेठेवरही पडतंच. या काळात दागदागिन्यांची दालनं नवनवीन डिझाईन्सनी सजतात. जास्तीत जास्त ग्राहकवर्ग आकर्षित व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. सध्या मुंबईच्या बाजारपेठांत चक्कर मारल्यावर हेच चित्र दिसतंय.