Fashion : बी फेस्टिव्ह रेडी!

Festive Season and trendy fashion : सणावाराच्या दिवसांमध्ये तुम्ही कोणत्या कपड्यांची निवड करणार?
fashion
fashionesakal
Updated on

सोनिया उपासनी

कुठल्याही सणसमारंभासाठी खरेदी करताना कधीच आउट ऑफ स्टाइल न जाणारे विशिष्ट प्रकारचे कपडे खरेदी केले, तर आर्थिकदृष्ट्यासुद्धा परवडते कारण दर सणाला खरेदी करण्याची गरज राहत नाही.

सध्याचा गणेशोत्सव, पाठोपाठ येणारे नवरात्र, दसरा आणि दिवाळी म्हणजे आता सणावारांचे दिवसच! पूर्वीच्या काळी सणवार म्हटले की कितीतरी आधीपासून तयारी सुरू व्हायची, कारण सर्व गोष्टी आज मिळतात तशा सहज उपलब्ध होत नसत. सर्व प्रकारचे दागिने, कपडे व लागणाऱ्या इतर गोष्टी आधी तयार ठेवलेल्या असायच्या. कपडे शिवून घेणे हे असेच आधीच तयारी करून केलेले काम.

बदलत्या काळाबरोबर काही गोष्टी सोप्या होत गेल्या. रेडिमेड कपड्यांनी बाजारपेठा सजल्या, आणि ‘क्विक शॉपिंग’ होऊ लागली. समारंभासाठी मिळणाऱ्या नानाविध पोशाखांची मोठमोठाली दालने प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात आहेत. वधुवरांसाठीचे स्पेशल पोशाख असोत अथवा घरातील इतर पुरुष मंडळींसाठी, बच्चेकंपनीसाठी, घरातील वयोवृद्ध स्त्रियांसाठी व कॉलेज युवकांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.