रेखा नाबर
वाढप
४ व्यक्तींसाठी
साहित्य
चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, ४ टेबलस्पून पेस्ट (आले, लसूण, मिरची, कोथिंबीर), चवीनुसार सैंधव, तेल, मोहरी, हिंग, बेसन, किंचित गूळ.
कृती
सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून कुस्करावेत. त्यात पेस्ट व मीठ घालून मळून घ्यावे. १ टेबलस्पून गरम तेलात हिंग, मोहरीची फोडणी करून पिठावर ओतून छान मळून ठेवावे. बेसनामध्ये बेताचे पाणी, सैंधव व किंचित गूळ घालून एकजीव करावे. आप्पेपात्राच्या प्रत्येक खोलगट भागात अर्धा चमचा तेल घालून तापत ठेवावे.
बटाट्याच्या मिश्रणाचे खोलगट भागापेक्षा लहान आकाराचे गोळे करावेत. बेसनाच्या मिश्रणात प्रत्येक गोळा बुडवून गरम तेलात ठेवावा. एका बाजूने खरपूस भाजल्यावर उलटावा. दुसऱ्या बाजूने चांगला भाजल्यावर बाहेर काढावा. अशा पद्धतीने सर्व आप्पे करून घ्यावेत. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.