किशोर पेटकरकोलकत्यात फुटबॉल प्रचंड लोकप्रिय आहे. क्रिकेटच्या झंझावातातही कोलकत्यातील स्टेडियमवर फुटबॉल लढतींसाठी अफाट गर्दी लोटते. २०२४-२५पासून आयएसएल मैदानावर कोलकता नगरी व तेथील फुटबॉलवर जास्त झोत असेल. .भारतीय फुटबॉलमध्ये कोलकता नगरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पश्चिम बंगालच्या राजधानीस भारतीय फुटबॉलची पंढरीच मानले जाते. या शहरातील दोन जुनेजाणते संघ ‘मोहन बागान’ आणि ‘ईस्ट बंगाल’ यांच्यातील कोलकता डर्बी (दोन्ही संघांमधील फुटबॉल सामन्याला कोलकता डर्बी या नावाने ओळखतात) असेल, तर तेथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण (सॉल्ट लेक स्टेडियम) फुटबॉलप्रेमींच्या गर्दीने ओसंडून वाहते. २०२०-२१पासून कोलकता डर्बी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अनुभवायला मिळत आहे. मोहन बागान, तसेच ईस्ट बंगालने पूर्णतः व्यावसायिक रूप धारण करत आयएसएल स्पर्धेत प्रवेश केला. ईस्ट बंगालच्या तुलनेत मोहन बागान संघ आयएसएल स्पर्धेत अधिक प्रमाणात सफल ठरला. आता या दोन संघांच्या सोबतीस कोलकत्यातील ‘मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब’ हा आणखी एक संघ आयएसएल स्पर्धेत दाखल होत आहे.मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब हा फुटबॉल पंढरीतील आणखी एक जुना आणि नावाजलेला संघ. त्यांची आय-लीग फुटबॉल स्पर्धा जिंकण्याची स्वप्नपूर्ती यावेळी झाली. २०२३-२४मधील आय-लीग स्पर्धा जिंकल्याने मोहम्मेडन स्पोर्टिंग २०२४-२५मधील आयएसएल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. व्यावसायिकतेच्या धर्तीवर आवश्यक क्लब परवाना निकष पूर्ण झाले, की १३३ वर्षांची परंपरा असलेला हा संघ आयएसएल स्पर्धेस खऱ्या अर्थाने पात्र ठरेल. .आयएसएल स्पर्धेस २०१४मध्ये सुरुवात झाली. यंदा या स्पर्धेने दशकपूर्ती साजरी केली. सुरुवातीस फक्त मनोरंजनात्मक फुटबॉल या दृष्टीने पाहिले जात असलेल्या आयएसएल स्पर्धेने अवघ्या काही वर्षांतच भारतातील अव्वल श्रेणी फुटबॉल स्पर्धेचा दर्जा मिळविला. या भव्यदिव्य स्पर्धेला आशियाई फुटबॉल परिषदेने (एएफसी) आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघानेही (एआयएफएफ) मान्यता दिली आहे. त्यामुळेच आयएसएलमधील लीग विनर्स शिल्ड जिंकणारा संघ एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळू शकतो. पूर्वी आय-लीग ही देशातील मुख्य श्रेणी स्पर्धा होती. मात्र आयएसएलच्या आगमनानंतर व्यावसायिकदृष्ट्या खूपच मागे असलेली आय-लीग स्पर्धा देशातील द्वितीय श्रेणी स्पर्धा बनली. एआयएफएफ यांच्यातर्फे आय-लीग स्पर्धा घेतली जाते, तर आयएसएल स्पर्धा व्यवस्थापन पूर्णतः स्वतंत्र आणि व्यावसायिक. २०२२-२३मध्ये आय-लीग विजेत्या संघाला आयएसएल स्पर्धेत बढती देण्यावर एकमत झाले. त्यामुळे पंजाब एफसीला २०२३-२४मधील आयएसएल स्पर्धेत स्थान मिळाले, तर आता यावेळच्या आय-लीग स्पर्धेत मोहम्मेडन स्पोर्टिंगची स्वप्नपूर्ती झाली. आयएसएल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एकाच शहरातील तीन संघ खेळताना दिसतील. भारतीय फुटबॉलमधील कोलकता नगरीचे माहात्म्य आणखीनच ठळकपणे अधोरेखित झालेले आहे. .दीर्घकालीन प्रतीक्षाकोलकत्यातील तिन्ही संघांना ऐतिहासिक शतकी परंपरा आहे. मोहन बागान क्लबची स्थापना १५ ऑगस्ट १८८९ रोजी झाली. त्यानंतर २२ फेब्रुवारी १८९१ रोजी मोहम्मेडन स्पोर्टिंगची मुहूर्तमेढ रोवली गेली. ईस्ट बंगाल क्लब १ ऑगस्ट १९२० या दिवशी स्थापन झाला. १९३४ साली मोहम्मेडन स्पोर्टिंगने कलकत्ता फुटबॉल लीग (सीएफएल) जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय क्लब हा मान त्यांना मिळाला. १९४०मध्ये ड्युरँड कप जिंकून त्यांनी पुन्हा इतिहास घडवला. आशियाई खंडातील ही एक जुनी स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय क्लब हा मानसुद्धा मोहम्मेडन स्पोर्टिंगनेच मिळविला आहे. नंतरच्या काळात मोहन बागान व ईस्ट बंगालने व्यावसायिकदृष्ट्या आणि यशस्वीतेतही मोठी झेप घेतली. तुलनेत मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब पिछाडीवरच राहिला. आता आयएसएल स्पर्धेत खेळताना त्यांना मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागेल, तेव्हाच हा जुना संघ मोठा आवाका असलेल्या व्यावसायिक फुटबॉल मैदानावर टिकून राहील. मोहन बागान व ईस्ट बंगालने काळाची पावले ओळखली आणि खंबीर आर्थिक पुरस्कर्ता मिळविला. तरीही ईस्ट बंगाल संघ अजून आयएसएल स्पर्धेत अपेक्षेइतका रुळलेला नाही. मोहम्मेडन स्पोर्टिंगलाही दर्जेदार, अनुभवी खेळाडू करारबद्ध करून आयएसएल मैदानावर लौकिक उंचवावा लागेल आणि त्यासाठी तिजोरीतही सुबत्ता आणावी लागेल. कारण अमाप पैसा ओतल्याशिवाय व्यावसायिक फुटबॉलमध्ये खंबीरपणे पाय रोवता येत नाहीत. भारतीय फुटबॉल स्पर्धेत व्यावसायिक धर्तीवर राष्ट्रीय फुटबॉल लीग (एनएफएल) १९९६-९७मध्ये सुरू झाली. कालांतराने या स्पर्धेला आणखीनच व्यावसायिक करताना २००७-०८मध्ये आय-लीग असे सुटसुटीत नाव देण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरील या प्रमुख स्पर्धेत मोहम्मेडन स्पोर्टिंगला छाप पाडता आली नाही. २००८-०९ व २०१३-१४मध्ये खराब कामगिरीमुळे त्यांची आय-लीगमधून पदावनती झाली. १३३ वर्षांची परंपरा असलेल्या क्लबला व्यावसायिकता झेपली नाही. त्यांचे अर्थकारण चुकले. कौतुकाची बाब म्हणजे, संकटे येऊनही मोहम्मेडन स्पोर्टिंगने वेळोवेळी फिनिक्स भरारी घेण्याचे धाडसही दाखवले आहे. त्यामुळे त्यांना २०२३-२४मध्ये प्रथमच आय-लीग स्पर्धा जिंकून दीर्घकालीन प्रतीक्षा संपुष्टात आणता आली. आयएसएल स्पर्धेकडे टक लावून बसलेले श्रीनिधी डेक्कन, गोकुळम केरळा या मातब्बर संघांना मागे टाकत मोहम्मेडन स्पोर्टिंगने एकूण १३ संघांच्या आय-लीगमध्ये दिमाखात अग्रस्थान मिळविले. त्यांनी २४ सामन्यांतून ५२ गुणांची कमाई केली. दुसऱ्या स्थानावरील श्रीनिधी डेक्कनपेक्षा त्यांनी चार गुण जास्त नोंदवत ध्येय साध्य केले. मोहम्मेडन स्पोर्टिंगच्या यावेळच्या यशात त्यांचे रशियन प्रशिक्षक आंद्रे चेर्नीशोव याचे योगदान बहुमूल्य आहे. ते बचावफळीत सेंटर बॅक या जागी खेळत. निवृत्तीनंतर ते प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरले. या ५६ वर्षीय रशियन मार्गदर्शकाने भारतीय फुटबॉलमध्ये ठसा उमटवला आहे. २०२१-२२मध्ये त्यांनी मोहम्मेडन स्पोर्टिंगला मार्गदर्शन केले होते, मात्र नंतर करार वाढला नाही. २०२३मध्ये आय-लीग स्पर्धा नजरेसमोर ठेवून मोहम्मेडन स्पोर्टिंग व्यवस्थापनाने चेर्नीशोव यांना पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्त केले. इतर प्रशिक्षकांना न जमलेला करिष्मा चेर्नीशोव यांनी प्रदर्शित केला आणि मोहम्मेडन स्पोर्टिंगला झळाळी मिळाली. .कोलकत्यातील फुटबॉलचे वर्चस्ववर्ष २०२३-२४मध्ये देशांतर्गत फुटबॉलमध्ये कोलकत्यातील संघांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मोहम्मेडन स्पोर्टिंगने आय-लीगमध्ये बाजी मारल्यानंतर मोहन बागानने आयएसएल शिल्डवर प्रथमच हक्क सांगितला. त्यांनी २०२३-२४मधील आयएसएल स्पर्धेतील साखळी फेरीअंती सर्वाधिक ४८ गुण प्राप्त करताना मुंबई सिटीला एका गुणाने मागे टाकले. यापूर्वीही आयएसएल स्पर्धेत कोलकत्यातील संघांनी दबदबा राखलेला आहे. या शहरातील एटीके संघाने तीन वेळा आयएसएल करंडक जिंकला. एटीके आणि मोहन बागान यांच्यात मनोमिलन झाल्यानंतर हा संघ २०२२-२३मध्ये पुन्हा आयएसएल करंडक विजेता ठरला. मोहन बागानचे सर्वाधिक मालकी हक्क आरपीएसजी ग्रुपचे संजीव गोयंका यांच्याकडे आहेत. यावर्षी या संघाचे मोहन बागान सुपर जायंट्स असे नामकरण झाले. नाव बदलल्यावरही लौकिक टिकवून ठेवता आला, मैदानावरील कामगिरी सरसच ठरली. स्पॅनिश हुआन फेर्रांडो यांच्यावर संघ व्यवस्थापन नाराज झाल्यानंतर अनुभवी स्पॅनिश मार्गदर्शक अंतोनियो लोपेझ हबास यांना प्रशिक्षकपदी करारबद्ध करण्यात आले. मोहन बागानने जोरदार उसळी घेत चाहत्यांना खूश केले. गतवेळी करंडक, तर यंदा शिल्ड जिंकून आयएसएल स्पर्धेतही यशस्वी मोहोर उमटवली आहे. मोहन बागानने आय-लीग स्पर्धाही दोन वेळा जिंकलेली आहे.कोलकत्यात फुटबॉल प्रचंड लोकप्रिय आहे. क्रिकेटच्या झंझावातातही कोलकत्यातील स्टेडियमवर फुटबॉल लढतींसाठी अफाट गर्दी लोटते. २०२४-२५पासून आयएसएल मैदानावर कोलकता नगरी व तेथील फुटबॉलवर जास्त झोत असेल.---------------.Artificial Sweetener : त्या मुलीच्या मृत्यूच्या कारणाचा केकमधील 'आर्टिफिशियल स्वीटनर' शी संबंध?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.