बुद्धीच्या विचारविश्वाच्या विकासातील दोन महत्त्वाचे टप्पे पुनरुज्जीवन आणि प्रबोधन. दोन्ही वेळा बुद्धीला श्रद्धेपासून दूर करायचे कसोशीचे प्रयत्न झाले. धर्माचा किंवा निसर्गाचा पांगुळगाडा न होता बुद्धीला आपल्या पायावर उभे करायची आवश्यकता तत्त्ववेत्त्यांना वाटली.