भक्ती बिसुरे
नेपाळ, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, बाली, जपान, चीन अशा अनेक देशांमध्ये गणपतीच्या मूर्ती आहेत. तुर्कियेमध्येही मंगलमूर्ती दिसतात. रोम आणि श्रीलंकेतही बाप्पाच्या मूर्ती आहेत. या सगळ्या मूर्ती प्राचीन आहेत. कंबोडिया हा देश मूर्तीस्थापत्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तिथे गणपती ‘प्रह कनेस’ या नावाने ओळखला जातो. गणेशाची ही मूर्ती उजवा पाय डाव्या पायावर ठेवून मांडी घातलेल्या स्वरूपातील आहे.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या‘, असं म्हणत बाप्पाला निरोप दिल्या क्षणापासून वेध लागत असतात, ते श्री गजाननाच्या पुनरागमनाचे. आणि त्याचे प्रत्यक्ष आगमन होण्याच्या कितीतरी आधीपासून तयारी सुरू असते त्याच्या उत्सवाची.