प्रणव पाटील
‘सुखकर्ता दुःखहर्ता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशाला लोकसंस्कृतीत महत्त्वाचं स्थान आहे. ओव्या, गण, लावण्या, गोंधळ, फाग, खेळे अशा वेगवेगळ्या लोकगीतांमध्ये गणेशवंदना पाहायला मिळते.
महाराष्ट्राच्या श्रद्धाविश्वात गणपती हा सर्वांत लाडका देव म्हणून प्रसिद्धी पावला आहे. या देवतेचा लोकदैवतांच्या देव्हाऱ्यातही समावेश झाला आहे. त्यामुळे लोकगायकांनी गणवंदनेतून या दैवताला अग्रस्थान देऊन त्याचा गौरव केला आहे. वेंडी फ्लॅहार्टी या संशोधकाने म्हटलं आहे, की गणेशाच्या अभ्यासाची सुरुवात करून एखाद्याला भारतीय संस्कृतीच्या कोणत्याही अंगाचे ज्ञान करून घेता येईल.
लोकसाहित्यातील लोकगीतांची ओळख श्रीगणेशाच्या अभ्यासातून कशी होऊ शकते, हे पाहूया.