वैष्णवी वैद्य-मराठे
श्रावणाच्या येण्याबरोबर ओढ लागते ती भाद्रपदात येणाऱ्या गणेश चतुर्थीची. श्री गजानन आपले आराध्यदैवत मानले जाते. गणपती बाप्पाशी आपली भावनिक नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणताना आकर्षक सजावट करावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.