डॉ. श्रीकांत कार्लेकर
भूप्रक्षोभक हालचालींमुळे येत्या पाच ते दहा दशलक्ष वर्षांमध्ये आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होतील आणि हा नवीन महासागर तयार होईल, असा भूगर्भशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. तांबडा समुद्र आणि एडनचे आखात, आफार प्रदेश आणि पूर्व आफ्रिकन खचदरीत पाणी घुसल्यामुळे हा नवीन समुद्र तयार होईल. परिणामी, पूर्व आफ्रिकेचा हा भाग वेगळा भूखंड म्हणून विकसित होईल.