संभाजी गंडमाळेसाजासह अस्सल कोल्हापुरी दागिने आणि त्यासाठी लागणारे लांबट, गोलसर मणी फक्त कोल्हापुरातच तयार होतात. कारण कुशल कारागीर आणि त्यांना साथ देणारं पूरक हवामान इथं आहे. तसंच सोन्याचा सर्वाधिक पातळ पत्रा फक्त कोल्हापुरातच काढता येतो. .एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज... ही लावणी आजही मराठी माणसाला भुरळ घालते. कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची ही प्रसिद्ध रचना. साज म्हटल्यानंतर मनात उभी राहणारी.गदिमांच्या या रचनेत ज्या साजासाठी दाजिबांना कोल्हापुरी जाण्याचा आग्रह होतो त्या कोल्हापुरी साजाला आपल्या परंपरेत सौभाग्याच्या अनमोल लेण्याचं स्थान आहे. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया १९६०मध्ये भारत दौऱ्यावर असताना तिलाही या कोल्हापुरी साजाची भुरळ पडली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना गुजरीतील कारेकर सराफ यांच्याकडील कोल्हापुरी साज शासकीय भेट म्हणून दिला. तो त्यांनी परिधानही केला व साजावरील नाजूक कलाकुसरीबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं. नव्या-जुन्याचा संगम साधणाऱ्या कोल्हापुरी साजाला आजही केवळ देशभरातच नव्हे तर जगभरात मागणी आहे. अस्सल कोल्हापुरी साज घडवण्यासाठी कोल्हापूरची प्रमुख सराफ बाजारपेठ असलेली ‘गुजरी’ नेहमीच सज्ज आहे.गदिमांच्या लावणीतही भेटणारी ही गुजरी म्हणजे शहराचं आर्थिक केंद्रच. मुख्य रस्त्यावर भव्य शोरूम्स दिसत असल्या तरी आतमध्ये अगदी दाटीवाटीचा हा परिसर. पण इथंच कोल्हापुरी साज आणि अस्सल कोल्हापुरी दागिने घडतात. पद्मशांती अपार्टमेंटच्या कमानीतून आत गेल्यावर तळमजल्यावर सराफ व्यावसायिक विजयकुमार भोसले-सरदार भेटतात. इंडियन बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशन, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ, जिल्हा सराफ संघ अशा संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्याशी भेट झाली तेव्हा छत्रपती संभाजीनगरहून ऑर्डर आलेल्या सोन्याचा कोल्हापुरी साज पाठवण्याचीच लगबग सुरू होती. भोसले-सरदार मग भरभरून सांगू लागले, ‘कोल्हापुरी साजाच्या निर्मितीला विविध धार्मिक ग्रंथ, पौराणिक कथांचा आधार आहे. श्रमसंस्कृती, कृषी संस्कृतीचेही प्रतिबिंब त्यातून दिसते. साज हा दागिना मूळचा एकवीस पानांचा. जवमणींच्या माध्यमातून ही पानं एकत्र गुंफली जातात आणि साजाला आकार प्राप्त होतो. पूर्वी ही पानं एकत्र गुंफण्यासाठी सोन्याचीच तार वापरली जायची. पण अलीकडच्या काळात रेशमी दोरा वापरला जातो.’ .‘एकवीस पानांपैकी दहा पानांवर कधी भगवान विष्णूंचे दशावतार कोरलेले असतात. आठ पानांवर अष्टमंडळ. आणि उर्वरित दोन पानाड्या. लाल पानाडी माणिक तर हिरवी पानाडी पाचूचे प्रतीक आणि एकविसावे लाल मण्याचे पान म्हणजे साजाचा घाट; अर्थात पदक किंवा पेंडंट. एकूणच कोल्हापुरी साजावरील विविध पानांवर ताईत, कारले, भोंगा, दोडका, शंख, चक्र, चंद्र, वाघनखं, नाग, कासव, कीर्तिमुख, गंडभैरी, मासा, चाफेकळी, मोर्चेल, जलकुंभ, औषधी वनस्पती असं वेगेवगळ्या प्रकारचं नक्षीकाम केलेलं असतं. अर्थात या प्रत्येक गोष्टीला धार्मिक, पौराणिक आणि नैसर्गिक संदर्भ आहेत. एकवीस पानांचा हा साज साठ ग्रॅमपासून दीडशे ग्रॅमपर्यंत घडवता येतो. हल्ली प्रत्येकाच्या बजेटनुसारही तो उपलब्ध होतो. अकरा, तेरा, पंधरा अशा विविध पानांमध्ये तो साकारला जातो.कोल्हापुरी साज घडविण्यासाठी आवटी काढण्यापासून (म्हणजे मणी करण्यापासून) ते गाठवण्यापर्यंत (पानं एकत्रित गुंफून लाल रेशमी भरजरी गोंडा लावण्यापर्यंंत) किमान आठ ते दहा कारागीर काम करत असतात.साजामध्ये आता दशावतारी, श्रीकृष्ण, चंद्र, पेशवाई, नर्तकी, पाटील, कोयली, बेलपान, शिंदेशाही तोडे, चित्ताक असेही विविध प्रकार आहेत. कर्नाटकी साजही आता आपल्याकडे तयार होतो.’ ठुशी, लाखी माळ, पट्टी, पुतळी हार, ड्रॉप्स माळा, वज्रटीक, चिंचपेटी इत्यादी दागिन्यांची मागणी सध्या वाढली असल्याचंही भोसले-सरदार सांगतात.भोसले-सरदारांशी गप्पा मारत असतानाच तिथे ज्येष्ठ व्यावसायिक मधुकर पेडणेकर यांच्याशी गाठभेट झाली. त्यांनी दिलेली माहितीसुद्घा इथं मांडाविशी वाटते. केवळ देशभरातच नव्हे, तर कोल्हापुरी साजाला परदेशातूनही खूप मागणी आहे. सोन्याच्या वाढत्या भावामुळे कोल्हापुरी साजासाठी आता चांदीही वापरली जाते आणि त्यावर मग सोन्याचा मुलामा चढवला जातो. साजासह अस्सल कोल्हापुरी दागिने आणि त्यासाठी लागणारे लांबट, गोलसर मणी फक्त कोल्हापुरातच तयार होतात. कारण कुशल कारागीर आणि त्यांना साथ देणारं पूरक हवामान इथं आहे. तसंच सोन्याचा सर्वाधिक पातळ पत्रा फक्त कोल्हापुरातच काढता येतो. त्यामुळं इथं एक ग्रॅम सोन्यातून वीस मण्यांची निर्मिती होते. इतर ठिकाणी मण्यांची ही संख्या आठ ते दहा इतकीच असते. .एकूणच दागिन्यांचा विचार केला तर कोल्हापुरी दागिना लाईटवेट असतो. त्या तुलनेत इतर ठिकाणचे दागिने वजनाने अधिक असतात. एकट्या कोल्हापूर शहर परिसराचा विचार केला तर चाळीस हजारांवर महिला घरोघरी लाखेच्या मण्यांची कामं करतात! हे काम हस्तकलेचा उत्तम आविष्कार आहे. म्हणूनच हे अस्सल दागिने जगभरात फक्त कोल्हापुरातच साकारले जातात. अगदी गेरा पॉलिशचा प्रकारही इथंच यशस्वी झाला आहे. त्यामुळं दागिना अधिक उठून दिसतो.अलीकडच्या काळात साजांमध्ये विविध रत्नं आणि खड्यांचाही वापर होऊ लागला आहे. एकीकडे रेडिमेड दागिन्यांची बाजारपेठ इतकी मोठी आहे, की आता सोन्यासारखाच दिसणारा कुठलाही दागिना जुजबी किमतीत बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. पण अस्सल कोल्हापुरी, लखलखीत, घसघशीत आणि घरंदाज बाज हवा असेल तर तो कोल्हापुरी साज आणि कोल्हापुरी दागिन्यांमुळेच मिळतो. त्याचमुळे या दागिन्यांची भुरळ अजूनही कायम आहे. किंबहुना ऐतिहासिक, पौराणिक मालिकांचा प्रभाव जसा वाढत आहे तशी ही मागणी आणखीन वाढत असल्याचं पेडणेकर सांगतात. कोल्हापुरी साजाची भुरळ आजही सर्वदूर पसरली आहे. म्हणूनच वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने कोल्हापुरी साज आणि दागिन्यांची निर्मिती कशी होते, यावर एक माहितीपट करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या माहितीपटातून कोल्हापुरी दागिने आता नव्या पिढीसमोर येणार आहेत. त्यासाठीचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं असून लवकरच हा माहितीपट सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.(लेखक दै. सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचे वार्ताहर आहेत. )--------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.