अनेक देशांतील मध्यवर्ती बँका विदेशी चलनाला (डॉलर, युरो इ.) पर्याय म्हणून सोने खरेदी करत असतात. आपला देशसुद्धा सोने खरेदीमध्ये मागे नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या म्हणण्यानुसार, भारताकडील एकूण परकीय चलन साठा ६४५ अब्ज डॉलर अशा सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. जगभरातील अनेक मध्यवर्ती बँकांकडून लक्षणीय प्रमाणात होत असलेल्या सोने खरेदीमुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.