साप्ताहिक
इंग्रजी भाषेतील पुस्तकं कशी आणि का वाचायची? चला करूया 'माय मराठी' पासून ‘My इंग्रजी’ च्या प्रवासाला सुरुवात..!
एखादी यादी संपवून माणूस चांगला वाचक होत नाही. ती यादी आयुष्यभर स्वतः करण्याचं भाषिक बळ आलं, की तो खरा प्रगल्भ वाचक होतो
डॉ. आशुतोष जावडेकर
भाषा प्रेमळच असते. म्हणून तर मराठीला आपण ‘माय मराठी’ म्हणतो. आता इंग्रजीलाही ‘My इंग्रजी’ करूया! इंग्रजी भाषेतील पुस्तकं कशी आणि का वाचायची हे बघूया. चांगले माहितीपर लेख ते अभिजात ललित साहित्य या सगळ्यांमध्ये आस्वाद घेण्यासारखं काहीतरी असतंच. मराठीत त्याचा आनंद आपण घेत असतोच. आता तो आनंद इंग्रजीत कसा घ्यायचा, हे जोडीनं शोधूया!