आजची युवा पिढी मोबाईलमध्ये दंग आहे अशी ओरड गेली काही वर्षे सर्वत्र ऐकायला मिळते. छंद जोपासायला या पिढीकडे वेळ नाही, हादेखील याच चर्चेचा पुढचा भाग.
एखादं पुस्तक वाचण्याऐवजी मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेल्या या पिढीला नावं ठेवण्यापेक्षा त्यांना पर्याय उपलब्ध करून द्यावा, असा विचार एका आजीने केला.
त्यातून ‘पुस्तकांचं हॉटेल’ ही संकल्पना जन्माला आली, आणि आता हे पुस्तकांचं हॉटेल वाचनचळवळीचा भाग झालं आहे.