गुढीपाडव्याचा दिवस असतोच खास. चैत्राच्या आगमनाची नांदी करणाऱ्या या दिवसाचे लेणे वसंतासारखे चैतन्यपूर्ण, नावीन्याने नटलेले आणि उत्साहाने सळसळणारे असते.
पाडवा म्हणजे पहिली तिथी. पंचांगभाषेत सांगायचे झाले, तर प्रतिपदा म्हणजे पाडवा. गुढी हा मात्र एक शब्द नसून त्यात शब्दसमूह सामावलेला आहे. अनेक प्रकारचे साहित्य एकत्र येऊन गुढी तयार होते. पण त्याला शास्त्रोक्त पार्श्वभूमी आहे आणि त्या अनुषंगाने आलेले नियम आहेत, हेही जाणून घेणं क्रमप्राप्त आहे.