मानव, मानवाशी निकट संबंध येणारे प्राणी आणि संसर्गजन्य आजारांच्या अभ्यास करते ही संस्था

आत्तापर्यंत भारतात आलेल्या संसर्गजन्य आजारांच्या अनेक साथी आटोक्यात आणण्यासाठी मौलिक योगदान दिलेल्या संस्थेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेले आहे.
Haffkine Institute
Haffkine Instituteesakal
Updated on

सुधीर फाकटकर

भारतात उद्‍भवलेल्या कॉलऱ्याच्या संसर्गजन्य महासाथीचा अभ्यास करून त्यावर प्रतिबंधात्मक लस शोधण्यासाठी पॅरिसमधील पाश्चर संस्थेने वॉल्डेमर हाफकिन नावाच्या सूक्ष्मजीव शास्त्रज्ञाला १८९२मध्ये भारतात पाठवले. हे वाल्डेमर हाफकीन (Waldemar Haffkine, १८६०-१९३०) मूळचे आताच्या युक्रेनमधले. कलकत्त्यात (आता कोलकता) दाखल झालेले हाफकिन पुढे तीनचार वर्षांनी त्यावेळच्या मुंबई प्रांतात प्लेगचा उद्रेक झाल्यामुळे मुंबईतील ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयात कॉलरा आणि प्लेगवर संशोधन करण्यासाठी आले. या विद्यालयातील खोल्यांच्या रांगांदरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी या आजारांवर लस विकसित करण्यास सुरुवात केली. अथकपणे काम करीत अवघ्या तीन वर्षात हाफकिन यांनी प्लेगवरील प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्यात यश मिळवले. या लशीची त्यांनी स्वतःवर चाचणी घेऊन सुरक्षितता सिद्ध केली होती. मानवजातीला भयभीत करून सोडणाऱ्या प्लेगवरील ही पहिली लस.

Haffkine Institute
Women Health : चाळीशीतच जाते पाळी, महिलांमध्ये वाढले अकाली रजोनिवृत्तीचे प्रमाण, जाणून घ्या कारणे

ग्रॅन्ट महाविद्यालयातील हाफकिन यांची ‘प्रयोगशाळा’ १८९९मध्ये जवळच्याच (आता महानगरी मुंबईचे एक उपनगर असलेल्या) परळ गावात स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित झाली. पुढच्या दोन दशकांत जीवाणूविषयक तसेच विषाणुविरोधी संशोधनाला चालना मिळत गेली आणि या प्रयोगशाळेचा विस्तार होत गेला. १९२५मध्ये या प्रयोगशाळेचे ‘हाफकिन संस्था’ (Haffkine Institute) असे नामकरण झाले.

मानव, मानवाशी निकट संबंध येणारे प्राणी आणि संसर्गजन्य आजारांच्या अभ्यास-संशोधनाबरोबर प्रतिबंधात्मक औषधोपचार विकसित करणे, विकसित माहिती आणि तंत्रविज्ञान जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणे तसेच समान विषय-क्षेत्रातील संस्थांशी साहचर्य प्रस्थापित करणे असे ध्येय असलेली ही संस्था महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीत काम करते. आत्तापर्यंत भारतात आलेल्या संसर्गजन्य आजारांच्या अनेक साथी आटोक्यात आणण्यासाठी मौलिक योगदान दिलेल्या हाफकिन संस्थेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेले आहे.

Haffkine Institute
Health Care : हिवाळ्यात अंगदुखी जाणवतेय? मग, जाणून घ्या त्यामागची 'ही' कारणे

संस्थेत जीवाणुशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रुग्णालयीन औषधशास्त्र, विषविज्ञान, संसर्ग आणि प्रतिकारशक्तिशास्त्र, माणूस आणि प्राणी यांच्यातील एकमेकांना संसर्ग होणाऱ्या आजारांचे (झुनॉसीस) शास्त्र, रासायनिक तपासणी आणि रासायनिक औषधांच्या वापरातील उपचारपद्धती (केमोथेरपी) असे स्वतंत्र विभाग आहेत. या विभागांना अद्ययावत प्रयोगशाळा आणि उपकरणांची जोड आहे. तसेच या संस्थेत अद्ययावत रूग्णालय व समृद्ध ग्रंथालयदेखील आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेग, कॉलराच्या निमित्ताने सुरू झालेल्या या संस्थेने स्वाईन फ्लू, अ‍ॅन्थ्रॅक्स, पोलिओपासून विविध दंशविरोधी उपचार तसेच अलीकडील कोरोना साथीच्या कालावधीत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. याच अनुषंगाने संस्थेने या दशकात सुमारे शंभर संशोधन प्रकल्प यशस्वी केले आहेत, असे इथल्या संशोधन अहवालांचा आढावा घेतल्यास लक्षात येते. संशोधन प्रकल्प केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद तसेच सरकारच्या संसर्ग सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत राबवले जातात.

Haffkine Institute
Health Care News : चयापचय वाढवण्यासाठी आहारात या पेयांचा समावेश करा!

शिक्षणासंदर्भात इथे जैववैद्यकीय विषयांतर्गत सूक्ष्मजीवशास्त्र, उपयोजित जीवविज्ञान, सेंद्रिय रसायनशास्त्र तसेच वैद्यकीय विषाणुविज्ञान, जीवाणुशास्त्र अशा काही विषयांमध्ये एम.एस्सी. तसेच पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची सुविधा आहे. तसेच इथल्या प्रशिक्षण आणि काही प्रयोगशाळांच्या माध्यमातून एका दिवसापासून सहा महिन्यांपर्यंतचे विविध अभ्यासक्रम राबवले जातात. असे अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रातील संसर्गजन्य तसेच दंशविषयक आजार-उपचार विषयात कार्य करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. संस्थेत स्थापनेपासून संकलित झालेल्या संसर्गजन्य तसेच दंशविषयाशी निगडित सूक्ष्मजीव, रोगप्रसार करणारे किटक-प्राणी तसेच वैद्यकीय साधने, उपचार प्रणाली दर्शविणारे देखावे असलेले खास संग्रहालय पाहिल्यानंतर या संस्थेचे महत्त्व लक्षात येते.

हाफकिन संस्था

आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई 400012, महाराष्ट्र.

संकेतस्थळः https://www.haffkineinstitute.org

Haffkine Institute
JN.1 Covid : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट विरोधात बूस्टर डोस घ्यायची आवश्यकता आहे की नाही? काय म्हणतात तज्ज्ञ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.