नेहा लिमये
के-पॉप अगदी अलीकडेच, म्हणजे २०००नंतर वगैरे आलं, असं वाटू शकतं. पण खरंतर त्याची सुरुवात झाली ती १९५० साली. ‘द किम सिस्टर्स’ नावाच्या तीन कोरियन मुलींनी मिळून अमेरिकेत पॉप गाण्यांचे शो केले. गंमत म्हणजे या तिघींना इंग्लिश अजिबात यायचं नाही. फक्त अमेरिकी उच्चार, त्याचा लहेजा आत्मसात करून त्या अमेरिकी पॉप सादर करायच्या.